GT vs RCB IPL 2022: विराट कोहलीला OUT करण्याआधी मोहम्मद शमीने का मागवली मेजर टेप?
GT vs RCB IPL 2022: पहिल्यांदा शमी थांबला, तेव्हा असं वाटलं की, तो स्वत:ला एडजेस्ट करण्यासाठी हे करतोय. चेंडू टाकण्यासाठी उडी घेण्याआधी लक्ष विचलित झाल्यास गोलंदाज थांबतो.
मुंबई: क्रिकेटमध्ये काही वेळा आपल्याला अशा गोष्टी पहायला मिळतात, ज्या आपल्याला हैराण करुन सोडतात. आयपीएल 2022 चा निम्मा सीजन संपला आहे. BCCI च्या टी 20 लीगमध्ये अनेक गोष्टी पहायला मिळाल्या आहेत. आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB) सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये आज जे पहायला मिळालं, ते कदाचितच तुम्ही याआधी कधी पाहिलं असेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या डावातील पहिल्या षटकात हे घडलं. मोहम्मद शमी (Mohammed Shami) गुजरात टायटन्सकडून पहिली ओव्हर टाकत होता. शमीने पहिलाच चेंडू स्ट्राइकवर उभ्या असलेल्या विराटला टाकला. त्यानंतर शमीला अचानक मेजर टेपची गरज भासली. तुम्हाला प्रश्न पडला असेल, शमीला मेजर टेपची गरज का भासली? त्याचं झालं असं की, शमीने पहिल्या ओव्हरमधील पहिला चेंडू टाकल्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतला. पण शमी मध्येच थांबला.
डगआउटकडे त्याने इशारा केला
पहिल्यांदा शमी थांबला, तेव्हा असं वाटलं की, तो स्वत:ला एडजेस्ट करण्यासाठी हे करतोय. चेंडू टाकण्यासाठी उडी घेण्याआधी लक्ष विचलित झाल्यास गोलंदाज थांबतो. शमी बरोबर दुसऱ्यांदा असं घडलं, तेव्हा त्याने डगआउटकडे इशारा करुन मेजर टेप मागवली.
ऑन फिल्ड अंपायर थोडे नाराज
डग आउट एरियामधून डॉमिनिक ड्रेक्स हातात मेजर टेप घेऊन मैदानावर धावत आले. या मेजर टेपच्या सहाय्याने मोहम्मद शमीने आपल्या रनअपचं मोजमाप घेतलं. ज्यामुळे त्याची लय बिघडत होती. शमीच्या या कृतीमुळे ऑन फिल्ड अंपायर थोडे नाराज झाले. अंपायर शमी बरोबर बोलले सुद्धा. मेजर टेप आल्यानंतर शमीने आपला रनअप मार्क केला व पहिली ओव्हर टाकली.
Mohammed Shami had to re-measure his run-up after bowling just one delivery! ??@Sdoull said he’s never seen this happen before – have you?#GTvRCB | #IPL2022 | #RCBvGT pic.twitter.com/NDNTaPxUR6
— ?Flashscore Cricket Commentators (@FlashCric) April 30, 2022
आज शमी महागडा ठरला
पहिल्या षटकात शमीचा चेंडू स्विंग जरुर झाला. पण त्याला विकेट मिळाली नाही. नंतरच्या काही षटकांमध्ये त्याला विराट कोहलीचा विकेट मिळाला. शमीने आपल्या अप्रतिम यॉर्करवर विराटला आऊट केलं. आज शमी थोडा महागडा ठरला. चार षटकात 39 धावा देत एक विकेट घेतला.