IPL 2022: MS Dhoni आपली बॅट का चावतोय? त्यामागे काय कारण आहे?
IPL 2022: काल चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 91 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. धोनीने या डावात छोटी 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) विरुद्धच्या सामन्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत धोनी आपली बॅट चावताना दिसतोय. धोनीचा हा फोटो पाहून फॅन्सही हैराण झाले. धोनी आपली बॅट का चावतोय? हाच प्रश्न सर्वांना पडला. धोनी हा नेहमीच आपली बॅट चावत असतो, हा त्याच्या सवयीचा भाग आहे. धोनी सोबत अनेक सामने खेळलेल्या अमित मिश्राने (Amit mishra) हा खुलासा केला आहे. धोनीला बॅट चावायची सवय का आहे? त्यामागे काय कारण आहेत? ते अमित मिश्राने सांगितलं. “तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, धोनी आपली बॅट का चावतोय?, बॅटवर लावलेली टेप हटवण्य़ासाठी धोनी हे सर्व करतोय. तुम्हाला एकही धागा धोनीच्या बॅटवर मिळणार नाही” असं अमित मिश्राने सांगितलं.
धोनीची छोटी पण महत्त्वाची खेळी
काल चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 91 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. धोनीने या डावात छोटी 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने 8 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. अखेरीस धोनीने केलेल्या फलंदाजीच्या बळावरच 208 धावा होऊ शकल्या. दिल्लीचा डाव फक्त 117 धावात आटोपला.
In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022
प्लेऑफ बद्दल धोनी म्हणाला….
दिल्ली विरुद्ध 91 धावांनी विजय मिळवल्यानंतर धोनी म्हणाला की, “आमच्या संघाने चांगलं प्रदर्शन केलं. हा विजय सीजनच्या सुरुवातीला मिळाला असता, तर बरं झाल असतं. टीम प्लेऑफमध्ये पोहोचणार की, नाही हे आपल्याला ठाऊक नाही. प्लेऑफमध्ये नाही पोहोचलो, म्हणून काही हा शेवट नाही” “हा एक परफेक्ट सामना होता. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचं होतं. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली, ज्याचा फायदा झाला” असं धोनी म्हणाला.