IPL 2022 CSK Captainship: CSK च्या टीममध्ये अंतर्गत धुसफूस, Ravindra jadeja च्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर, वाचा Inside Story

IPL 2022 CSK Captainship: चेन्नई आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. मुंबई पाठोपाठ चेन्नईच्या टीमने सर्वाधिक चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पण यंदाच्या सीजनमध्ये चेन्नईची टीम खूपच खराब कामगिरी करत आहे.

IPL 2022 CSK Captainship: CSK च्या टीममध्ये अंतर्गत धुसफूस, Ravindra jadeja च्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर, वाचा Inside Story
csk Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 10:53 AM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा मध्यावर आलेली असताना, काल चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) एका मोठी घडामोड घडली. खरंतर असं काही तरी घडेल, अशी कोणीच अपेक्षा केली नव्हती. कारण चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटने कधी धरसोड वृत्तीने निर्णय घेतलेले नाहीत. काल रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. पुन्हा एकदा या टीमचे नेतृत्व एमएस धोनीकडे (MS Dhoni) सोपवण्यात आलं आहे. आयपीएल 2022 स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी जाडेजाला कर्णधारपदावर नियुक्त करण्यात आलं होतं. हा निर्णय स्वत: धोनीने घेतला होता. धोनीने जवळपास दशकभरापेक्षा जास्त काळ CSK चं कर्णधारपद भुषवल्यानंतर रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली होती. पण रवींद्र जाडेजाला आपली छाप उमटवता आली नाही.

पॉइंटस टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटून दुसरी

रवींद्र जाडेजाने कॅप्टनशिप सोडण्य़ामागचं एक कारण आहे संघाची खराब कामगिरी. चेन्नई आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. मुंबई पाठोपाठ चेन्नईच्या टीमने सर्वाधिक चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पण यंदाच्या सीजनमध्ये चेन्नईची टीम खूपच खराब कामगिरी करत आहे. चेन्नईने आठ पैकी सहा सामने गमावले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे जाडेजाच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं.

जाडेजाने काय कारण दिलं?

“रवींद्र जाडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एमएस धोनीला पुन्हा कॅप्टनशिप संभाळण्याचा आग्रह केला आहे. एमएस धोनीने सगळ्यांच हित लक्षात घेऊन CSK ची कॅप्टनशिप संभाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येईल” असं सीएसकेने सोशल मीडिया अकाऊंटवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण जाडेजाच्या कॅप्टनशिप सोडण्यामागच्या निर्णयामागे खरं कारण दुसरचं असल्याचं आता समोर आलं आहे.

CSK च्या टीममध्ये आतमध्ये काय घडत होतं?

इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्ता्नुसार, सीएसकचे प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक आणि मॅनेजमेंट कॅप्टन म्हणून रवींद्र जाडेजाच्या कामगिरीवर नाखुश होते. त्याने कॅप्टनशिपवरुन पायउतार होण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. “कॅप्टन म्हणून रवींद्र जाडेजा निरुत्साही, पराभूत वाटत होता. त्याच्याकडे कल्पकतेचा अभाव दिसला. संघाचं नेतृत्व करण्यासाठी त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसला नाही” असे सीएसकेच्या कॅम्पमधील सूत्रांनी सांगितलं. आज रविवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. त्यावेळी एमएस धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना मैदानावर दिसेल. खरंतर कॅप्टन जाडेजा होता. पण अनेक सामन्यांमध्ये एमएस धोनीचं मैदानावर निर्णय घेताना दिसायचा. त्यावरुन सोशल मीडियावर CSK ला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.