IPL 2022: ऋद्धिमान साहा मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, नॉकआउट सामन्याआधी आपल्या संघाची साथ सोडणार

लाइम-लाइट आणि बातम्यांपासून ऋद्धिमान साहा तसा लांबच रहातो. पण भारतीय संघातून वगळणं, पत्रकार बोरिया मजूमदार यांनी दिलेली धमकी आणि IPL 2022 मधील दमदार प्रदर्शन यामुळे ऋद्धिमान साहा पुन्हा चर्चेत आहे.

IPL 2022: ऋद्धिमान साहा मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, नॉकआउट सामन्याआधी आपल्या संघाची साथ सोडणार
wriddhiman saha Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 1:19 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋद्धिमान साहा (Wriddhiman saha) मागच्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे. लाइम-लाइट आणि बातम्यांपासून ऋद्धिमान साहा तसा लांबच रहातो. पण भारतीय संघातून वगळणं, पत्रकार बोरिया मजूमदार यांनी दिलेली धमकी आणि IPL 2022 मधील दमदार प्रदर्शन यामुळे ऋद्धिमान साहा पुन्हा चर्चेत आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना ऋद्धिमान साहा दमदार प्रदर्शन करतोय. आता पुन्हा एकदा साहाचं नाव चर्चेत आहे. नॉकआऊट सामने सुरु होण्याआधी साहा आपल्या संघाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. त्याला आपला संघ बदलायचा आहे. ऋद्धिमान साहाच्या डोक्याता हा जो विचार सुरु आहे, तो आयपीएलमधल्या गुजरात टायटन्स (IPL Gujarat Titans) संघाबद्दल नाहीय. गुजरात टायटन्स हा आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. ऋद्धिमान साहाचं आणखी एका संघाबरोबर जुनं नात आहे. तो बरीच वर्ष त्या संघाकडून खेळतोय. लवकरच हा संघ नॉकआऊट राऊंडची मॅच खेळणार आहे.

सर्व संबंध संपवण्याचा गांभीर्याने विचार

ऋद्धिमान साहा बऱ्याचवर्षापासून पश्चिम बंगालसाठी सुद्धा क्रिकेट खेळतोय. तो बंगालचा संघ सोडण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगाल हे ऋदिमान साहाच गृहराज्य आहे. त्याने बंगालमधूनच आपल्या क्रिकेट करीयरला सुरुवात केली. 37 वर्षाचां साहा आता बंगाल क्रिकेट संघटनेबरोबरच आपलं नातं तोडणार आहे. ऋदिमान साहा बंगाल क्रिकेट संघटनेबरोबरबरचे सर्व संबंध संपवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच तो कॅबकडे NOC प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकतो.

कॅबने सोमवारी केली घोषणा

बंगाल क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात रणजीच्या नॉकआऊटचा सामना खेळणार आहे. क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी कॅबने सोमवारीच आपल्या संघाची घोषणा केली. या संघात साहाचा समावेश करण्यात आला आहे. साहाला आता बंगाल क्रिकेट संघाकडून खेळण्याची इच्छा नाहीय.

भारताच्या कसोटी संघातून वगळलं

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या कसोटी संघातून साहाला वगळण्यात आलं. त्यानंतर त्याने रणजी ग्रुप स्टेजसाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं होतं. नॉकाआऊट राऊंडसाठी उपलब्ध आहे किंवा नाही, यावर ऋद्धिमान साहाने कॅबला काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याचा संघात समावेश केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.