IPL 2023 | सर्व मेहनतीवर ‘पाणी’, गुजरात विरुद्ध चेन्नई सामना रद्द?
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना रंगणार आहे. त्याआधी संपूर्ण तयारी झाली आहे. मात्र या दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमाच्या महाकुंभाला शुक्रवार 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमासाठी आयपीएल प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट नसल्याने यंदा धडाक्यात रंगारंग कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत. त्यानंतर सलामीच्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस
आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र त्याआधी 30 मार्च रोजी संध्याकाळी उशिरा अहमदाबाद आणि स्टेडियमच्या आसापासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याआधी गुजरातचे खेळाडू हे सराव करत होते. मात्र पाऊस आल्याने खेळाडू आडोशाला निघून गेले. गुजरात टायटन्सने पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गुजरातचा कोच आशिष नेहरा पावसाची मजा घेताना दिसतोय.
अहमदाबादमध्ये पावसाची हजेरी
Who are you when it rains, #TitansFAM? ⚡️?☔️⛈️#AavaDe | #TATAIPL2023 pic.twitter.com/X8AXZvaKV0
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 30, 2023
सामन्याच्या दिवशी पावसाची ‘बॅटिंग’?
या पावसामुळे हा सामना रद्द होणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना सतावतेय. अहमदाबादमध्ये 31 मार्च रोजी वातावरण कसं असेल हे आपण जाणून घेऊयात. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये तापमान हे 29 ते 32 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. पण 30 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे चाहत्यांच्या मनात सामना रद्द होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
स्टेडियम परिसरात जोरदार पाऊस
Heavy rain at the Narendra Modi Stadium currently. pic.twitter.com/vkVbf8lcZH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2023
चेन्नई सुपरकिंग्स टीम
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायले जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा.
गुजरात टायटन्स टीम
हार्दिक पांड्या (कॅप्टन), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मैथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साईं सुदर्शन.