LSG vs MI IPL 2023 : आज लखनऊचा एक बॉलर मुंबई इंडियन्सचा विजयाचा खेळ बिघडवू शकतो

LSG vs MI IPL 2023 : कोण आहे तो लखनऊचा बॉलर?. पॉइंट्स टेबलची स्थिती अशी आहे की, एक-एक पॉइंट आता महत्वाचा बनलाय. अशावेळी पराभव हा कुठल्या गुन्ह्यापेक्षा कमी नसेल.

LSG vs MI IPL 2023 : आज लखनऊचा एक बॉलर मुंबई इंडियन्सचा विजयाचा खेळ बिघडवू शकतो
IPL 2023 Mumbai IndiansImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 3:14 PM

लखनऊ : आज मिश्रा जी, शर्मा जी आणि वर्मा जी एकत्र मैदानावर खेळताना दिसणार आहेत. IPL 2023 मध्ये पहिल्यांदा असं घडणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हे दृश्य पहायला मिळेल. दोन्ही टीम्स या सीजनमध्ये पहिल्यांदा भिडणार आहेत. विजयापेक्षा काही कमी नको, याच इराद्याने दोन्ही टीम्स आज मैदानात उतरतील.

दोन्ही टीम्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पॉइंट्स टेबलची स्थिती अशी आहे की, एक-एक पॉइंट आता महत्वाचा बनलाय. अशावेळी पराभव हा कुठल्या गुन्ह्यापेक्षा कमी नसेल. मुंबई इंडियन्सची टीम 12 मॅचमध्ये 14 पॉइंट्ससह चांगल्या स्थितीत आहे. आजच्या मॅचमध्ये अमित मिश्रा प्रभावी ठरु नये, अशीच मुंबई इंडियन्सची इच्छा असेल. कारण त्याची गोलंदाजी चालली, तर मुंबईच्या अडचणी वाढू शकतात.

मिश्रा जी चालेल, तर मुंबई येईल अडचणीत

हे सुद्धा वाचा

लखनऊ सुपर जायंट्सचे पॉइंट्स टेबलमध्ये 12 सामन्यात 13 पॉइंट्स आहेत. अमित मिश्रा मुंबई इंडियन्स विरुद्ध चालला, तर लखनऊचा पुढचा प्रवास सोपा होईल. म्हणजे आजच्या सामन्यात मिश्रा जीं ची भूमिका महत्वाची राहू शकते.

शर्मा जी विरुद्ध मिश्रा जी

शर्मा जी म्हणजे रोहित शर्मा, वर्मा जी म्हणजे तिलक वर्मा. दोन्ही मुंबई इंडियन्सचे आशास्थान आहेत. रोहित शर्मा या सीजनमध्ये विशेष चाललेला नाहीय. आज अमित मिश्राचे चेंडू वळले, तर लखनऊ विरुद्ध सुद्धा रोहितच काही चालणार नाही. रोहित शर्मा विरुद्ध अमित मिश्राचे आकडेच तसे आहेत.

रोहितला त्याने सर्वाधिकवेळा OUT केलय

अमित मिश्राने IPL मध्ये सर्वाधिक 7 वेळा रोहित शर्माला आऊट केलय. दोघे परस्पराविरुद्ध 17 इनिंगमध्ये आमने-सामने आलेत. रोहितने अमित मिश्राच्या 91 चेंडूंचा सामना केलाय. त्याने 87 धावा केल्या आहेत. अमित मिश्राने या दरम्यान 7 वेळा रोहितला आऊट केलय.

इशान किशनसाठी सुद्धा डोकेदुखी

रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या इशान किशनला सुद्धा अमित मिश्रा हैराण करतो. मिश्रासमोर इशान किशनच फार काही चालत नाही. इशान किशन IPL च्या 3 इनिंगमध्ये अमित मिश्राचे 8 चेंडू खेळलाय. यात त्याने केवळ 8 धावा करताना 3 वेळा इशान मिश्राच्या गोलंदाजीवर आऊट झालाय. वर्मा जी आणि मिश्रा जी आज येऊ शकतात आमने-सामने

आज शर्मा जी विरुद्ध मिश्रा जी या लढाईत कोण जिंकतं? त्याची उत्सुक्ता असेल. वर्मा जी चा अजून मिश्रा जी बरोबर आमना-सामना झालेला नाहीय. पण आज हा सामना होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.