IPL 2023 Auction: बेन स्टोक्स, सॅम करन या दोघांवर ‘या’ 6 फ्रेंचायजी नक्कीच बोली लावणार
IPL 2023 Auction: ...पण यापेक्षा जास्त रक्कम खर्च नाही करणार
मुंबई: आयपीएल 2023 च्या सीजनसाठी ऑक्शन दोन दिवसांवर आलय. या ऑक्शनमध्ये बेन स्टोक्स आणि सॅम करन हे दोन मोस्ट वाँटेड खेळाडू असणार आहेत. 8 पैकी 6 फ्रेंचायजी या दोघांवर हमखाल बोली लावतील. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. यंदाच्या ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर्स खेळाडूंना जास्त मागणी असणार आहे. बेन स्टोक्स आणि सॅम करन या दोघांनी यंदाच्या इंग्लंडच्या टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पर्स नक्कीच रिकामी करतील
सॅम करन आणि बेन स्टोक्सला महागड्या किंमतीला विकत घेण्यासाठी काही फ्रेंचायजी आपली पर्स नक्कीच रिकामी करतील. पण काही फ्रेंचायजीना हे परडवणारं नाही. अन्य फ्रेंचायजींच्या तुलनेत सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन टीम्स इंग्लंडच्या या दोन प्लेयर्ससाठी जास्त रक्कम खर्च करु शकतात. कारण त्यांच्या पर्समध्ये तितकी रक्कम आहे.
किती रक्कम खर्च करतील?
“कुठल्याही खेळाडूसाठी फ्रेंचायजी 20 लाख डॉलर्सपर्यंत रक्कम खर्च करण्याची शक्यता कमी आहे. एसआरएच आणि पीबीकेएसच्या पर्समध्ये तितकी रक्कम आहे. पण एका प्लेयर्ससाठी इतकी रक्कम खर्च करण्यासाठी ते स्पर्धा का करतील?” असे एका फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
‘या’ फ्रेंचायजी लावणार बोली?
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्सने त्यांच्या कॅप्टनला रिलीज केलय. कर्णधारपदासाठी ते नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. मुंबई इंडियन्स, सनराजयर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, आणि सीएसके या फ्रेंचायजी स्टोक्स आणि करन या दोघांना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. मुंबईला सुद्धा टिम डेविडच्या साथीला एका चांगल्या ऑलराऊंडरची गरज आहे.