IPL 2023 Auction Live Streaming: जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता आयपीएल 2023 ऑक्शन
IPL Auction 2023 Live Updates: ऑक्शन कुठे होणार? किती खेळाडू आहेत? किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स.
कोच्ची: इंडियन प्रीमियर लीग 2023 चं ऑक्शन शुक्रवारी कोच्ची येथे होणार आहे. मागच्यावर्षी मेगा ऑक्शन झालं होतं. पण यावेळी असं नाहीय. या ऑक्शनसाठी 900 पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला नाव नोंदवलं होतं. पण शेवटच्या यादीत फक्त 405 नावं होती. आता 10 टीम्सच्या बोली लावण्यावर या खेळाडूंच नशीब ठरेल. यावेळी आयपीएल ऑक्शन फक्त एक दिवस चालणार आहे. लिलावाच्या पूलमध्ये अनेक मोठी नावं आहेत. त्यामुळे हे ऑक्शन इंटरेस्टिंग होईल.
किती भारतीय, किती परदेशी खेळाडू?
आयपीएल 2023 च्या ऑक्शन पूलमध्ये 405 खेळाडू आहेत. या 405 पैकी 273 भारतीय खेळाडू आहेत. 132 परदेशी खेळाडू आहेत. यात 119 कॅप्ड प्लेयर्स आहेत. 282 अनकॅप्ड खेळाडू आहेत. असोशिएट देशांचे 4 खेळाडू आहेत. ऑक्शनमध्ये एकूण 87 जागांसाठी बोली लावली जाईल. यात 30 जागा परदेशी खेळाडूंसाठी रिझर्व्ह आहेत.
कुठल्या टीमकडे किती रक्कम शिल्लक?
सर्वच टीम्सनी भरपूर आधी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर केली होती. मागच्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वच टीम्सच्या पर्समध्ये एक समान रक्कम होती. पण यावेळी स्थिती वेगळी आहे. सनरायजर्स हैदराबादच्या पर्समध्ये सर्वाधिक 42.25 कोटी रुपये आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर पंजाब किंग्स आहे. त्यांच्याकडे 32.2 कोटी रुपये आहेत. लखनौ सुपरजायंट्सकडे 23.35 कोटी रुपये आहेत. केकेआरकडे 7.05 कोटी रुपये आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे फक्त 8.75 कोटी रुपये शिल्लक आहेत.
हे आहेत 2 कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू
केन विलियमसन, रायली रुसो, जेसन होल्डर, सॅम करन, कॅमरून ग्रीन, टॉम बॅटन, निकोलस पूरन, फिल सॉल्ट, क्रिस जॉर्डन, एडम मिल्न, आदिल राशीद, क्रिस जॉर्डन, ट्रेविस हेड, जिमी नीशन, रसी वेन डेर दुसेन, क्रिस लिन, जॅमी ओवर्टन, क्रेग ओवर्टन, टायमल मिल्स हे 2 कोटी रुपये बेस प्राइस असलेले खेळाडू आहेत.
जाणून कधी, कुठे पाहू शकता IPL 2023 ऑक्शन
कधी होणार आयपीएल 2023 च ऑक्शन?
आयपीएल 2023 च ऑक्शन 23 डिसेंबर 2022 रोजी शुक्रवारी होईल.
कुठे होणार आयपीएल 2023 चं ऑक्शन?
आयपीएल 2023 च ऑक्शन कोच्चीमध्ये होईल.
किती वाजता सुरु होणार आयपीएल 2023 ऑक्शन?
आयपीएल 2023 ऑक्शन दुपारी 2.30 वाजता सुरु होईल.
आयपीएल 2023 ऑक्शनच लाइव्ह टेलीकास्ट कुठे पाहता येईल?
आयपीएल 2023 ऑक्शनच लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहता येईल.
आयपीएल 2023 ऑक्शनचत लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
आयपीएल 2023 ऑक्शनच लाइव्ह स्ट्रीमिंग वायकॉम 18 च्या वूट APP वर पाहता येईल.