IPL 2023 Auction: Mumbai Indians लिलावात ‘या’ खेळाडूंवर लावणार बोली

IPL 2023 Auction: इशान किशनच्या रुपाने मुंबई इंडियन्सकडे चांगला विकेटकीपर फलंदाज आहे, पण....

IPL 2023 Auction: Mumbai Indians लिलावात 'या' खेळाडूंवर लावणार बोली
IPL 2023Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 1:35 PM

मुंबई: IPL 2023 ऑक्शनचे दिवस जवळ आलेत. 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये खेळाडूंवर बोली लागेल. 10 फ्रेंचायजी देश-विदेशातील खेळाडूंवर बोली लावणार आहेत. प्रत्येक टीमची स्वत:ची एक गरज आहे. त्या हिशोबाने ते बोली लावतील. मुंबई इंडियन्सबद्दल बोलायच झाल्यास, ते काही मर्यादीत खेळाडूंवर बोली लावतील. मुंबई इंडियन्सला प्रामुख्यने 3 खेळाडूंची गरज आहे. या तीन पैकी एक खेळाडू असा असेल, जो कायरन पोलार्डची जागा भरुन काढेल. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरचे बॅकअप म्हणून काही खेळाडू टीममध्ये असतील.

कुठल्या विभागात मुंबई इंडियन्सला हवे चांगले प्लेयर्स?

मुंबई इंडियन्सला मागच्या 2 सीजनमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. IPL 2023 ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने आपले 13 खेळाडू रिलीज केले. टॉप ऑर्डर आणि मॅच संपवण्यासाठी त्यांच्याकडे काही चांगले ऑप्शन्स आहेत. पण गोलंदाजीत मुंबई इंडियन्सला चांगल्या प्लेयर्सची आवश्यकता आहे.

पोलार्डची रिप्लेसमेंट कोण?

IPL 2023 साठीच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स 20.55 कोटी रुपयांसह उतरणार आहे. या पैशांमधून त्यांना 9 स्लॉट भरायचे आहेत. यात 3 परदेशी खेळाडू आहेत. कायरन पोलार्डचा पर्याय शोधण्याच मुंबई इंडियन्ससमोर एक मोठ चॅलेंज आहे. जो बॅट आणि बॉलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स देऊ शकेल. त्याशिवाय त्यांना बुमराह आणि आर्चरला झालेली दुखापत सुद्धा ध्यानात ठेवावी लागेल.

मुंबई इंडियन्स कोणावर बोली लावेल?

पोलार्डला पर्याय शोधताना मुंबई इंडियन्सची IPL 2023 साठी बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन आणि सॅम करण यांच्यावर नजर असेल. स्पिन गोलंदाजी मजबूत करण्यासाठी एडम जंपा, आदिल रशीद आणि तबरेज शम्सी यापैकी एकाला टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. आर्चरला बॅकअप म्हणून रिले मेरेडिथ किंवा दुष्मंता चामीरावर मुंबई इंडियन्स बोली लावू शकते.

या विकेटकीपरवर बोली लावणार?

मुंबई इंडियन्सकडे इशान किशनच्या रुपाने आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर आहे. दुसऱ्या विकेटकीपरसाठी नारायण जगदीशन आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर बोली लावू शकते. शिवम मावी आणि 23 वर्षाच्या विदवथ कवेरप्पा यांच्या खरेदीचा मुंबई इंडियन्स विचार करु शकते. हे दोन्ही गोलंदाज बुमहारची रिप्लेसमेंट ठरु शकतात.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.