IPL 2023 Auction मध्ये CSK साठी ‘हा’ असेल मोस्ट वाँटेड खेळाडू

IPL 2023 Auction: त्याला विकत घेण्यासाठी अजिबात पैशांचा विचार करु नका, अशी स्पष्ट सूचना एमएस धोनीने दिलीय.

IPL 2023 Auction मध्ये CSK साठी 'हा' असेल मोस्ट वाँटेड खेळाडू
csk Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 5:28 PM

मुंबई: आयपीएल 2023 चं ऑक्शन जवळ आलय. दहा फ्रेंचायजींनी ऑक्शनची रणनिती आखली आहे. सर्वात जास्त मागणी ऑलराऊंडर्स खेळाडूंना असणार आहे. मागच्या सीजनमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने खूपच सुमार कामगिरी केली होती. पुढच्या सीजनमध्ये मोठी सुधारणा घडवून आणण्याच त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्जची एका खेळाडूवर विशेष नजर असेल. त्याला विकत घेण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. या खेळाडूच नाव आहे सॅम करन.

बोली लावताना मागे-पुढे पाहू नका

सॅम करन आयपीएल 2022 मध्ये खेळला नाही. पण पुढच्या सीजनसाठी तो चेन्नई सुपर किंग्जच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये आहे. ड्वेयन ब्राव्होच्या जागी त्याचा आपल्या ताफ्यात समावेश करण्यासाठी चेन्नईची टीम उत्सुक आहे. सीएसके कॅम्पमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीने टीम मॅनेजमेंटला सॅम करनवर बोली लावताना मागे-पुढे पाहू नका, असा निर्देश दिले आहेत.

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करु शकतो

सॅम करन चेन्नई सुपर किंग्जसाठी अजिबात नवीन नाहीय. 2020 आणि 2021 च्या सीजनमध्ये तो चेन्नईकडून 23 सामने खेळलाय. “ब्राव्हो आता टीममध्ये नाहीय. सॅम करन डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करु शकतो. त्याशिवाय लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करु शकतो” असं सीएसके टीम मॅनेजमेंट जवळच्या सूत्रांनी सांगितलं.

टी 20 वर्ल्ड कप विजयात त्याची महत्त्वाची भूमिका

2020 मध्ये सीएसकेने सॅम करनला 5.5 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं होतं. सीएसके पुन्हा एकदा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतेय, याच कारणं त्याचा सध्याचा फॉर्म आहे. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.