IPL 2023 Awards List : ऑरेंज, पर्पल कॅपसह कोणाला कुठला पुरस्कार मिळाला जाणून घ्या, विजेत्यांची यादी
IPL 2023 Awards List : आयपीएल 2023 मधील पुरस्कार विजेत्यांची यादी एका क्लिकवर. ऑरेंज, पर्पल कॅपसह फेयर प्ले, सर्वाधिक चौकार असे सुद्धा पुरस्कार असतात. हे पुरस्कार कोणाला मिळाले ते जाणून घ्या.
अहमदाबाद : IPL 2023 चा विजेता संघ कुठला? हे अखेर काल ठरलं. पावसामुळे आयपीएलचा फायनल सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवला गेला. कालही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 15 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन मातब्बर संघ आमने-सामने होते. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रवींद्र जाडेजाने चौकार मारुन चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच पाचव विजेतेपद मिळवून दिलं.
गुजरात टायटन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 214 धावा फटकावल्या. पहिली ओव्हर सुरु असतानाच पाऊस आला. त्यामुळे सामना उशिराने रात्री 12 च्या सुमारास सुरु झाला.
ओव्हर्स कमी झाल्या
20 ऐवजी 15 ओव्हर्सचा सामना झाला. लक्ष्य घटवून 171 धावा झालं. गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माच्या गोलंदाजीवर चेन्नईल विजयासाठी 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. चेन्नईचा अनुभवी फलंदाज रवींद्र जाडेजा क्रीजवर होता. त्याने आधी सिक्स आणि नंतर फोर मारुन टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
चेन्नईकडून मुंबईची बरोबरी
चेन्नईच्या या विजेतेपदासह IPL 2023 च्या सीजनची सांगता झाली. चेन्नईने आता मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. चेन्नई आणि मुंबईच्या टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाचवेळा विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएलमध्ये दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या, सर्वाधिक विकेट घेणाऱ्या प्लेयर्सना पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय फेयर प्ले, सर्वाधिक चौकार असे सुद्धा पुरस्कार असतात. हे पुरस्कार कोणाला मिळाले ते जाणून घ्या.
IPL 2023 मधील पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
विजेते – चेन्नई सुपर किंग्स
ऑरेंज कॅप – शुभमन गिल
पर्पल कॅप – मोहम्मद शमी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – शुभमन गिल
एमर्जिंग प्लेयर – यशस्वी जैस्वाल
फेयरप्ले अवॉर्ड – गुजरात टायटन्स
सुपर स्ट्रायकर – ग्लेन मॅक्सवेल
सर्वाधिक चौकार – शुभमन गिल
सर्वोत्तम कॅच – राशिद खान
पीच आणि ग्राऊंड – इडन गार्डन्स, वानखेडे स्टेडियम