IPL 2023 आधी विराट कोहलीच्या RCB ला झटका, 3.2 कोटीला विकत घेतलेल्या खेळाडूला दुखापत

IPL 2023 : दुखापतीमुळे विराट कोहलीच्या RCB च्या अडचणी वाढणार आहेत. आधीच दोन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच टेन्शन असताना आता आणखी एका तिसऱ्या खेळाडूला दुखापत झालीय.

IPL 2023 आधी विराट कोहलीच्या RCB ला झटका, 3.2 कोटीला विकत घेतलेल्या खेळाडूला दुखापत
RCB Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 8:12 AM

IPL 2023 : आयपीएल 2023 चा सीजन सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला झटका बसला आहे. दुखापतीमुळे हा प्लेयर बांग्लादेश दौऱ्यावरुन माघारी परतणार आहे. विल जॅकच्या दुखापतीने RCB च टेन्शन वाढवलय. दुखापत झालेला आरसीबी टीममधला हा तिसरा प्लेयर आहे. दुखापतीमुळेच ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड आयपीएलच्या 16 व्या सीजनमधील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. फिल्डिंग करताना विल जॅकच्या डाव्या मांडीला शुक्रवारी दुखापत झाली. ECB अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहॅब प्रोसेससाठी पुढच्या 48 तासात जॅक मायदेशी इंग्लंडला रवाना होणार आहे.

किती कोटींना विकत घेतलं?

जॅकची दुखापत कितपत गंभीर आहे, त्याबद्दल स्पष्टता नाहीय. त्यामुळे तूर्तास त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल साशंकता आहे. डिसेंबर महिन्यात आयपीएलसाठी मिनी ऑक्शन झालं. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 3.2 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं. ग्लेन मॅक्सवेलला बॅकअप म्हणून विल जॅकच्या आरसीबीने आपल्या ताफ्यात समावेश केलाय. 2 एप्रिलला आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

विल जॅक इंग्लंडसाठी तीन फॉर्मेटमध्ये खेळतो. त्याला पुरेशी विश्रांती मिळालेली नाही. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडची टीम पाकिस्तान टूरवर गेली होती. त्यावेळी त्याने डेब्यु केला. ते दोघे आरसीबीसाठी महत्त्वाचे

दरम्यान जोश हेझलवूडच्या दुखापतीने आरसीबीच टेन्शन वाढवलं आहे. दुखापतीमुळेच तो चालू बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या एकाही सामन्यात खेळू शकलेला नाही. हेझलवूड आरसीबीसाठी पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज आहे. आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये त्याने 20 विकेट काढले. ग्लेन मॅक्सवेलची भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झालीय. RCB मॅनेजमेंटसमोर त्याच्याकडे फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.