Mumbai Indians च टेन्शन वाढलं, 17.50 कोटीला विकत घेतलेला खेळाडू गोलंदाजी करु शकणार नाही?
IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम मोजून 'या' प्लेयरला विकत घेतलय. आयपीएल इतिहासातील हा दुसरा महागडा खेळाडू आहे.
मुंबई: मुंबई इंडियन्ससाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. 23 डिसेंबरला IPL 2023 साठी लिलाव झाला. मुंबई इंडियन्सला एका चांगल्या ऑलराऊंडरची गरज होती. कारण मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला चांगल्या गोलंदाजांची आणि ऑलराऊंडरची उणीव जाणवली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 2023 साठी झालेल्या ऑक्शनमध्ये 17.50 कोटी रुपये खर्च करुन कॅमरुन ग्रीनला विकत घेतलं. पण कॅमरुन ग्रीन 13 एप्रिलपर्यंत फक्त बॅट्समन म्हणून टीममधून खेळू शकतो.
.…तर मुंबई इंडियन्सला बसणार फटका
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कॅमरुन ग्रीनसाठी वर्कलोड मॅनेजमेंट गाइडलाइन आखून दिली आहे. त्यानुसार, कॅमरुन ग्रीन 13 एप्रिलपर्यंत फक्त फलंदाजी करु शकतो. मुंबई इंडियन्सला या गाइडलाइन्सचं पालन करणं बंधनकारक असेल. कॅमरुन ग्रीनला मुंबई इंडियन्सने ऑलराऊंडर म्हणून विकत घेतलं होतं. त्यात तो 13 एप्रिलपर्यंत गोलंदाजी करणार नसेल, तर मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो. मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू कमकुवत आहे.
कधीपासून हा चार आठवड्याचा कालावधी सुरु होईल?
“क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्याल कळवलं आहे. कॅमरुन ग्रीन आयपीएलसाठी उपलब्ध असेल” असं बीसीसीआयचे सीईओ आणि हेमांग अमीन यांनी लिलावाच्या दिवशी सकाळी सर्व फ्रेंचायजींना सांगितलं होतं. ग्रीन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार असेल, तर चौथा कसोटी सामना झाल्यानंतर पुढचे चार आठवडे तो गोलंदाजी करु शकणार नाही. चौथा कसोटी सामना 9 ते 13 मार्च 2023 दरम्यान होईल. तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही
बॉर्डर गावस्कर सीरीज 13 मार्चला संपेल. ग्रीन या सीरीजमध्ये खेळला, तर 13 मार्चनंतर चार आठवडे 13 एप्रिलला संपतील. या दरम्यान IPL 2023 चा सीजन संपणार नाही. पण सुरुवातीचे काही सामने झालेले असतील. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये कॅमरुन ग्रीनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.