GT vs CSK : 0 वर 10 विकेट घेणाऱ्या प्लेयरची CSK मध्ये एंट्री, ओपनिंग मॅचआधी धुमाकूळ घालणार बॉलर चेन्नईच्या टीममध्ये
GT vs CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सच्या ओपनिंग मॅचआधी मुकेश चौधरीची रिप्लेसमेंट म्हणून हा गोलंदाज टीममध्ये आलाय. मुकेश चौधरीने मागच्या सीजनमध्ये चांगली गोलंदाजी केली.
GT vs CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सची टीम गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2023 ची ओपनिंग मॅच खेळणार आहे. या मॅचआधी चेन्नईच्या टीममध्ये प्रतिस्पर्धी टीमची वाट लावणारा एका गोलंदाज दाखल झालाय. टीमचा स्टार गोलंदाज मुकेश चौधरी दुखापतीमुळे टीमच्या बाहेर गेलाय. तो स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीचा सामना करतोय. त्याच्याजागी राजस्थानच्या एका गोलंदाजाचा टीममध्ये समावेश केलाय. हा गोलंदाज राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता.
मुकेश चौधरीने मागच्या सीजनमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याने 9.31 च्या इकॉनमीने 13 मॅचेसमध्ये 16 विकेट काढल्या. यात 11 विकेट त्याला पावरप्लेमध्ये मिळाले होते. मुकेशची रिप्लेसमेंट म्हणून सीएसकेने त्याच्यासारखीच दमदार बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजाचा टीममध्ये समावेश केलाय.
0 वर 10 विकेट
आकाश सिंह या गोलंदाजाच नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता. आकाशला लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. सीसएकेच्या फ्रेंचायजीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये त्याला विकत घेतलय. भारताकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेल्या आकाश सिंहकडे 9 टी 20 सामन्यांचा अनुभव आहे. यात 9 मॅचमध्ये त्याने 7 विकेट काढल्या आहेत. आकाशने एका मॅचमध्ये एकही धाव ने दता 10 विकेट घेण्याची कमाल केली आहे. त्याने ही कामगिरी क्लब क्रिकेटमध्ये केली होती.
नागालँडकडून डेब्यु
2017 साली जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एका टी 20 सामन्यात आकाशने 4 ओव्हरमध्ये एकही रन्स दिला नाही व 10 विकेट घेतल्या होत्या. आकाशने आपल्यासमोरच्या प्रतिस्पर्धी टीमला 36 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. या मॅचमध्ये त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. आकाशने 2019 मध्ये राजस्थान टीमकडून टी 20 मध्ये डेब्यु केला. 2022-2023 च्या देशांतर्गत सीजनमध्ये तो नागालँडकडून खेळला. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने नागालँड टीमकडून डेब्यु केला.