IPL 2023, DC | दिल्ली कॅपिट्ल्समध्ये ऋषभ पंत याच्या जागी ‘या’ स्टार विकेटकीपर बॅट्समनला संधी
दिल्ली कॅपिट्ल्स ऋषभ पंत हा अपघातातून झालेल्या दुखापतीतून हळुहळु सावरतोय. त्यामुळे पंतला 16 व्या मोसमात खेळता येणार नाही. यामुळे पंतच्या जागी युवा खेळाडूचा समावेश केला गेला आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या पर्वातील पहिल्या सामन्यासाठी सर्व तयारी झाली आहे. मोसमातील पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याच्या अवघ्या 3 तासांआधी मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल मॅनेजमेंटने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू जाहीर केले आहेत. आयपीएलने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार ऋषभ पंत याला अपघातामुळे या मोसमात खेळता येणार नाही. पंत विकेटकीपर आणि कर्णधार अशा दोन महत्वाच्या भूमिका बजावायचा. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी दिल्ली कॅपिट्ल्सने टीम मॅनेजमेंटने डे्विड वॉर्नर याला दिली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून पंत याच्या जागी अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
अभिषेक याने 16 फर्स्ट क्लास आणि 3 लिस्ट ए सामन्यांमध्ये बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंत याच्या अपघातामुळे अभिषेक याला ही संधी मिळाली आहे. आता संपूर्ण मोसमात अभिषेक विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यामुळे अभिषेक कशी कामगिर करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
डेव्हिड वॉर्नर कॅप्टन
दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीमचा कॅप्टन बदलला आहे. टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अपघातामुळे आता ती जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याला देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी वॉर्नरने टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.
“मला ही जबाबदारी दिली, मला त्यासाठी पात्र समजलं, यासाठी मी टीम मॅनेजमेंटचा आभारी आहे. ऋषभ हा सर्वोत्तम लीडर होता. त्याला आम्ही सर्व या मोसमात मिस करु”, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.
टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर) एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.