AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023, DC vs GT | पंत इज बॅक! ऋषभची गुजरात विरुद्ध्या सामन्यादरम्यान खास एन्ट्री

ऋषभ पंत याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात हजेरी लावली. पंतच्या या एन्ट्रीमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तर दुसऱ्या बाजूला पंत मैदानात दिसल्याने तो लवकरच मैदानात दिसेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.

IPL 2023, DC vs GT | पंत इज बॅक! ऋषभची गुजरात विरुद्ध्या सामन्यादरम्यान खास एन्ट्री
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:48 PM

दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 7 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार असेलला ऋषभ पंत याने स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. दिल्लीच्या या सामन्यात होम ग्राउंडमध्ये पंतने हजेरी लावल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. पंत तेव्हापासून झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

ऋषभच्या या हजेरीमुळे संपूर्ण स्टेडियममध्ये एकच माहोल पाहायला मिळाला. ऋषभ पंत सामन्यादरम्यान काठीच्या आधाराने चालताना दिसला. यावेळेस राजीव शुक्ला यांनी ऋषभची आत्मियतेने चौकशी केली. ऋषभ दिल्लीचा नियमित कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन आहे. मात्र यंदा त्याला अपघातातून झालेल्या दुखापतीमुळे 16 व्या मोसमात खेळता आलं नाही. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर याला या हंगामात नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंतच्या जागी टीममध्ये अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

अभिषेक याने 16 फर्स्ट क्लास आणि 3 लिस्ट ए सामन्यांमध्ये बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंत याच्या अपघातामुळे अभिषेक याला ही संधी मिळाली आहे. आता संपूर्ण मोसमात अभिषेक विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यामुळे अभिषेक कशी कामगिर करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऋषभ पंतची सामन्याला हजेरी

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन

डेविड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नार्त्झे आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

हार्दिक पंड्या (कर्णधार) , वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल आणि अलझारी जोसेफ.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.