AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK Win IPl Final 2023 : फायनलमध्ये गुजरातचा पराभव करत सीएसके पाचव्यांदा चॅम्पिअन

CSK Win IPl Final 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे.

CSK Win IPl Final 2023 : फायनलमध्ये गुजरातचा पराभव करत सीएसके पाचव्यांदा चॅम्पिअन
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 4:01 AM

मुंबई : आयपीएलच्या 16 पर्वामध्ये  चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील फायनल सामन्यात चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळवला आहेच. अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या विजयासह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडिअन्स संघासोबत बरोबरी केली आहे.

महेंद्र सिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर त्यांनी सीएसकेला फायनलमध्ये 215 धावांचं आव्हान दिलं होतं. साई सुदर्शनची 96 धावांची वादळी खेळी आणि साहाच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 200 धावांचा टप्पा केला होता. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर संघाना विजय संपादित केला आहे.

सीएसके बॅटींग

गुजरातने दिलेलं 215 धावांचं लक्ष्य पावसामुळे 171 धावांचं करण्यात आलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेचे सलामीवीर ऋुतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी 74 धावांची सलामी दिली होती. दोघांना एकाच ओव्हरमध्ये नूर अहमद याने आऊट करत सामना फिरवला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने 27 धावांची छोटेखानी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.

अजिंक्य रहाणेनंतर अंबाती रायडूनेही 19 धावा करत सामना खेचला. या दोघांनाही मोहित शर्माने आऊट करत सामना गुजरातच्या पारड्यात झुकवला होता. खरा गेम शेवटच्या ओव्हरमध्ये झाला. कारण 6 चेंडूत 13 धावांची गरज होती आणि पहिल्या चार चेंडूत 3 धावा आल्या त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 धावा हव्या होत्या. त्यावेळी रविंद्र जडेजाने सिक्स आणि चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....