IPL Final Ahmedabad Weather | चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याआधी जोरदार पाऊस, आता काय होणार?
अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 सामन्यातही जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे या सामन्याला सुरुवात होण्यास वेळ लागला होता. आता पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये महाअंतिम सामन्याआधी पाऊस झाला आहे.
अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम मॅचआधी अहमदाबादमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची आणि पर्यायाने दोन्ही संघांची चिता वाढली आहे. या पावसाचे व्हीडिओ ाणि फोटो सोशल मीडयावर व्हायरल झाले आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 26 मे रोजी झालेल्या क्वालिफायर 2 सामन्याआधीही अशाच प्रकारे पाऊस पडला होता. ज्यामुळे सामना हा 30 मिनिटं विलंबाने सुरु झाला होता.
अहमदाबादमध्ये पाऊस, सामन्याला विलंब
Bad news: Rain started, covers on. pic.twitter.com/6AB0Ze69Ue
— Johns. (@CricCrazyJohns) May 28, 2023
दरम्यान या पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. नियमानुसार टॉस 7 वाजता होणं अपेक्षित असतं. तर सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होते. मात्र या पावसामुळे टॉसला विलंब झालाय. त्यामुळे अर्थातच सामन्यालाही विलंबाने सुरुवात होणार आहे. मात्र सामना नक्की कधी सुरु होईल, ते काही सांगता येत नाही.
सामन्यातील षटकं कमी होणार?
दरम्यान पावसामुळे विलंब झाल्यास तेवढ्याच वेळेत खेळ पूर्ण करण्यासाठी सामन्यातील ओव्हर कमी केल्या जातात. आता या अंतिम सामन्यातील ओव्हर्स कमी करण्यात येणार का, तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर विजेता कोण ठरणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांंना पडलाय. या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.
या चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला रात्री 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत सुरुवात झाली, तर पूर्ण 20 ओव्हरचा खेळ होईल. मात्र त्यानंतर थोड्याही विलंबाने सामना सुरु झाल्यास 5-5 ओव्हरचाच खेळ होईल. यातही 5-5 ओव्हरचा खेळ हा 12 वाजून 6 मिनिटांपर्यंतच अपेक्षित आहे. म्हणजेच, 12 वाजून 6 मिनिटांपर्यतच 5-5 ओव्हरचा खेळ होऊन निकाल लागायला हवा. पण 12 वाजून 06 मिनिटांपर्यंत पाऊस थांबलाच नाही, तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल. 29 मे हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
? Update
It's raining ?️ in Ahmedabad & the TOSS has been delayed!
Stay Tuned for more updates.
Follow the match ▶️ https://t.co/IUkeFQS4Il#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/eGuqO05EGr
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.