IPL 2023 : इंडियन क्रिकेटचा ‘कबीर सिंह’, बायकोने सोडलं, करियर संकटात, यशस्वी पुनरागमन जमेल?

IPL 2023 : इंडियन क्रिकेटच्या या कबीर सिंहवर सगळ्यांच्या नजरा असतील. कबीर सिंह आपल्या प्रेमाबद्दल जितका गंभीर होता, तितकाच टीम इंडियाचा कबीर सिंह त्याच्या खेळाबद्दल गंभीर आहे.

IPL 2023 : इंडियन क्रिकेटचा 'कबीर सिंह', बायकोने सोडलं, करियर संकटात, यशस्वी पुनरागमन जमेल?
PBKS Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 12:16 PM

IPL 2023 News : कबीर सिंह हे बॉलिवूड फिल्ममधील एक कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. अभिनेता शाहीद कपूरने हा रोल केला होता. या रोलमधून शाहीदने प्रेक्षकांवर एक छाप उमटवली. भारतीय क्रिकेटमध्ये असाच एक खेळाडू आहे, ज्याची स्थिती कबीर सिंहच्या जवळपास जाणारी आहे. त्याच्या करियरवर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. त्याचं मन मोडलय. व्यक्तीगत आयुष्यात वादळ आलय. फरक इतकाच आहे की, तो कबीर सिंह सारखा नशेमध्ये बुडालेला नाही. तो जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न करतोय.

सध्या त्याची वेळ चांगली नाहीय. पण म्हणून त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. तो नेहमी हसतमुख असतो. तीच त्याची ओळख आहे. कबीर सिंह आपल्या प्रेमाबद्दल जितका गंभीर होता, तितकाच टीम इंडियाचा कबीर सिंह त्याच्या खेळाबद्दल गंभीर आहे.

वैवाहिक आयुष्यात चुकल्याची कबुली

भारतीय क्रिकेटमधील या कबीर सिंहच नाव आहे, शिखर धवन. धवनने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आयशा बरोबर लग्न केलं. आयशाचा आधी घटस्फोट झालेला. तिला दोन मुलं होती. पण, तरीही धवनने तिच्यासोबत लग्न केलं. धवनला आयशापासून एक मुलगा आहे, त्याच नाव जोरावर आहे. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या 10 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या घटस्फोटाचा खटला सध्या कोर्टात सुरु आहे. धवनसाठी सध्याचा काळ अडचणीचा आहे. धवनने अलीकडेच एका मुलाखतीत वैवाहिक आयुष्यात काही चूका केल्याच मान्य केलं.

नाही आणि करिअर सुद्धा संकटात

फक्त व्यक्तीगत आयुष्यात अडचणी नाहीयत. त्याच्या प्रोफेशनल क्रिकेट करियरसाठी सुद्धा सध्याचा काळ चांगला नाहीय. शिखर धवन टीम इंडियातून बाहेर गेलाय. आधी टेस्ट टीममधून बाहेर गेला. त्यानंतर टी 20 टीम आणि आता वनडे मधूनही धवनचा पत्ता कट झालाय. वनडेमध्ये काहीवेळा धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. पण आता वनडेमध्ये सुद्धा त्याची बॅट तळपत नाही. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. धवनची स्थिती कबीर सिंह सारखी आहे. प्रेम नाही आणि करिअर सुद्धा संकटात. आयपीएल ही शेवटची संधी

शिखर धवनकडे आता यंदाच्या आयपीएलमध्ये संधी आहे. त्याच्याकडे पंजाब किंग्सच नेतृत्व आहे. कॅप्टनशिप करताना त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला, तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी ही आयपीएल धवनसाठी एक मोठी संधी आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.