Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड याचा कारनामा, अर्धशतकासह विक्रमाला गवसणी
चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाड याने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध वेगवान अर्धशतक ठोकत विक्रम केला आहे.
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने विशेष करुन ओपनर बॅट्समन ऋतुराज गायकवाड याने या संधीचा फायदा घेतला. ऋतुराजने मैदानात उतरल्यापासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. ऋतुराजने यासह मोसमातील सलामीच्या सामन्यातच महारेकॉर्ड केला आहे.
ऋतुराजने अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. ऋतुराजचं हे आयपीएलच्या इतिहासातील वैयक्तिक वेगवान अर्धशतक ठोकलं आहे. ऋतुराजने सामन्यातील नवव्या ओव्हरमध्ये 2 षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजच्या या अर्धशतकामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत आहे.
ऋतुराज गायकवाड याचं अर्धशतक
First fifty of IPL 2023.
Fifty in just 23 balls by Ruturaj Gaikwad – Ruturaj has started with a bang! pic.twitter.com/NSApFBRS06
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2023
ऋतुराज याचा अनोखा कारनामा
ऋतुराजने या सलामीच्या सामन्यात अनोखा कारनामा केला आहे. ऋतुराजने या मोसमातील पहिली धाव, पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिलं अर्धशतक लगावत अफलातून आणि अद्भूत सुरुवात केली आहे.
2 खेळाडूंचं आयपीएल पदार्पण
चेन्नईकडून मराठमोळ्या राजवर्धन हंगरगेकर आणि गुजरातकडून जोशुआ लिटील अशा या दोघांचं या सामन्याच्या निमित्ताने पदार्पण झालं आहे. तर केन विलियमसन याचं गुजरातसाठी डेब्यू ठरलंय.
चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मराठी खेळाडू
चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगरगेकर या 2 मराठी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
चेन्नईमध्ये 5 ऑलराउंडर्स
चेन्नईच्या गोटात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये मोईल अली, रविंद्र जडेजा शिवम दुबे, बेन स्टोक्स आणि मिचेल सँटनर अशा तगड्या अष्टपैलू खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हमध्ये समावेश आहे. त्यामुळे या 5 जणांचं मजबूत आव्हान हे गुजरातसमोर असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.