GT vs MI IPL 2023 : Arjun Tendulkar च्या बाबतीत रोहित शर्मा हार्दिक पंड्यासारख नाही करणार, कारण….

GT vs MI IPL 2023 : Arjun Tendulkar च्या बाबतीत रोहित शर्माला ही रिस्क घ्यावीच लागेल. त्यामागे फक्त एकच कारण आहे. हार्दिक पंड्याने असा धोका पत्करला नव्हता. दोन्ही कॅप्टनसमोर आता सारखीच स्थिती आहे.

GT vs MI IPL 2023 : Arjun Tendulkar च्या बाबतीत रोहित शर्मा हार्दिक पंड्यासारख नाही करणार, कारण....
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 9:52 AM

GT vs MI IPL 2023 : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची मॅच आज गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. मागच्या सामन्यात पंजाब किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक आहे. कॅप्टन रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत मोठी रिस्क घेऊ शकतो. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यासमोर सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्याने रोहित शर्मा सारखी रिस्क घेतली नाही.

आधी हार्दिक पंड्या आणि आता रोहित शर्मा अशा कुठल्या विचित्र परिस्थितीत अडकलेत. मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या एका ओव्हरवर नजर टाकूया. चालू सीजनमधील ती सर्वात महागडी ओव्हर होती.

तो पर्यंत मुंबईसाठी सर्वकाही ओक्के

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 15 व्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी सर्वकाही ओके होतं. पंजाबची पहिली बॅटिंग सुरु होती. मुंबईची टीम सहज मॅच जिंकेल असं वाटत होतं. पंजाबच्या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकर 16 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्यानंतर सगळ चित्रच बदलल.

दोघांनी मिळून अर्जुन तेंडुलकरला धुतलं

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरच्या हाती चेंडू सोपवला. कारण त्याने पहिल्या दोन ओव्हरमध्ये 17 रन्स देऊन 1 विकेट काढला होता. क्रीजवर पंजाबचा सॅम करन आणि हरप्रीत भाटिया होते. त्यांना एका महागड्या ओव्हरची गरज होती. दोघांनी मिळून अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी फोडून काढली.

एका ओव्हरमध्ये फिरली मॅच

अर्जुनच्या या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 3 फोर मारण्यात आले. करन आणि भाटियाने एकूण 31 धावा लुटल्या. त्यामुळे या मॅचमध्ये अर्जुनच्या बॉलिंगची इकॉनमीच बदलून गेली. त्याच्या नावावर 3 ओव्हरमध्ये 48 रन्स 1 विकेट अशा खराब रेकॉर्डची नोंद झाली. या एका ओव्हरमध्ये मॅच फिरली. मुंबईला अनुकूल सामना पंजाबच्या बाजूने झुकला.

त्यानंतर हार्दिकने रिस्क नाही घेतली

अर्जुन तेंडुलकरने 1 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. त्याआधी असाच लज्जास्पद रेकॉर्ड गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या नावावर होता. त्या मॅचनंतर यश दयाल पुन्हा मैदानात दिसला नाही. हार्दिक पंड्याने त्याला बाहेर बसवलं. रोहित असं नाही करणार

रोहित शर्मा अर्जुनच्या बाबतीत असं करणार नाही. तो धोका पत्करेल, अर्जुनला पुन्हा संधी देईल. जेणेकरुन त्याचं खच्चीकरण होणार नाही. आत्मविश्वास कायम राहिलं. कारण ही एक ओव्हर सोडल्यास अर्जुनने आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात चांगली बॉलिंग केलीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.