IPL 2023 : गुजरात टायटन्सच्या प्लेयरची Love Jihad बद्दल पोस्ट, वादानंतर मागितली माफी
IPL 2023 : साक्षी मर्डर केसचा दाखल देत गुजरातच्या खेळाडूने ही पोस्ट शेयर केली होती. गुजरात टायटन्सच्या टीममध्ये खेळणारा एक प्लेयर चर्चेत आला आहे. एका पोस्टवरुन हा सर्व वाद निर्माण झाला.
अहमदाबाद : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स टीममधील एका खेळाडूच्या पोस्टवरुन मोठा वाद झालाय. मागच्या आठवड्यात IPL 2023 चा फायनल सामना खेळला गेला. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला हरवलं. चेन्नईने गुजरातच सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याच स्वप्न मोडलं. चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. याच गुजरात टायटन्सच्या टीममध्ये खेळणारा एक प्लेयर चर्चेत आला आहे.
गुजरात टायटन्सच्या प्लेयरने केलेल्या एका पोस्टवरुन हा सर्व वाद निर्माण झाला. या पोस्टचा दिल्लीत झालेल्या साक्षी हत्याकांडाशी संबंध होता.
संपूर्ण देशात या हत्याकांडाची चर्चा
गुजरात टायटन्सचा लेफ्टी बॉलर यश दयालने ही पोस्ट केली होती. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने हात जोडून माफी सुद्धा मागितली. दिल्लीमध्ये साहिल नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. संपूर्ण देशात या हत्याकांडाची चर्चा आहे. यश दयालने याच हत्याकांडाशी संबंधित एक पोस्ट केली.
सोशल मीडियावर मोठा गदारोळ
आरोपी साहिलने साक्षीवर अनेक वार करुन तिची हत्या केली. साक्षीच्या हत्येचा हा व्हिडिओ पाहून संपूर्ण देश हादरला. यश दयाल या हत्याकांडांशी संबंधित एक पोस्ट शेयर करुन फसला. तो ट्रोल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला.
जुनी पोस्ट डिलीट केली
हंगामा झाल्यानतंर यश दयालने आपली जुनी पोस्ट डिलीट केली व नवीन पोस्ट शेयर करुन लोकांची माफी मागितली. चुकून माझ्याकडून ही स्टोरी पोस्ट झाली होती. त्यासाठी त्याने माफी मागितली. “द्वेष पसरवू नका. मी प्रत्येक समुदाय, सोसायटीचा आदर करतो” असं यशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Yes Rinku Singh did the unthinkable. He played great shots in the last over. But to be frank the bowling was absolutely rubbish. Yash Dayal should be dropped from Team for a season if not more for this crime. #KKRvsGTpic.twitter.com/kbyXxGa2EB
— Crypto Cricketer (@cricketcoast) April 9, 2023
एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स
यश दयाल एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स खाल्ल्यामुळे चर्चेत आला होता. आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहने एकाच ओव्हरमध्ये त्याला पाच सिक्स मारले. लास्ट ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 28 धावांची आवश्यकता होती. दयाल गोलंदाजी करत होता. रिंकूने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारुन अशक्य वाटणारा विजय शक्य केला. आयपीएल 2023 मध्ये यश दयाल 5 सामने खेळला. त्यात त्याने 2 विकेट घेतले.