IPL 2023 Injured players : दुखापतीमुळे IPL 2023 मधून आतापर्यंत किती खेळाडू OUT ?
IPL 2023 Injured players : सर्व फ्रेंचायजींना खेळाडूंच्य दुखापतीचा फटका बसलाय. अनेक चांगले, मोठे खेळाडू दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये खेळताना दिसत नाहीयत.
IPL 2023 Injured player list : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होऊन चार दिवस झाले आहेत. आतापर्यंत सहा सामने झाले असून, क्रिकेट चाहते आयपीएलमध्ये T20 चा रोमांच अनुभवतायत. आयपीएलमधील सर्वच फ्रेंचायजींना जय-पराजयाबरोबर खेळाडूंच्या फिटनेसची चिंता आहे. कारण टुर्नामेंट सुरु होण्याआधीच सर्व फ्रेंचायजींना खेळाडूंच्य दुखापतीचा फटका बसलाय. अनेक चांगले, मोठे खेळाडू दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये खेळताना दिसत नाहीयत.
सहाजिकच त्याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होताना दिसतोय. मुंबई इंडियन्स याच उत्तम उदहारण आहे. जसप्रीत बुमराह नसल्यामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू कमकुवत झालीय. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात हे दिसून आलं.
आयपीएल टीमचे कॅप्टन आऊट
मुंबई इंडियन्सप्रमाणेत कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स या टीम्सना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसलाय. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत हे तर आयपीएल टीम्सचे कॅप्टन होते.
डेविड वॉर्नरकडे नेतृत्व
श्रेयस अय्यर कोलकाता नाइट रायडर्स आणि ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला. त्याच्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या. पुढचे काही महिने तो मैदानात परतणार नाहीय. त्यामुळे त्याच्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्ली टीमच नेतृत्व दिलय.
श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास सुरु आहे. त्यामुळे तो बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत तो खेळला. चौथ्या कसोटीत पुन्हा त्रास सुरु झाला, त्यामुळे तो दोन्ही इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नाही.
फिटनेस लेव्हलवर लक्ष ठेवण्यासाठी खास डिवाइस
टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळे बीसीसीआयला खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना त्यांच्या फिटनेस लेव्हलवर लक्ष ठेवण्यासाठी खास डिवाइस देण्यात आलय. जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. बुमराहची जागा घेऊ शकणारा त्या तोडीचा गोलंदाज नाहीय. त्यामुळे बीसीसीआयने आधीच खेळाडूंच्या फिटनेससाठी फ्रेंचायजींना काही सूचना केल्या आहेत.
यंदाचा आयपीएल सीजन सुरु होण्याआधीच 9 खेळाडू आऊट झाले होते. सीजन सुरु झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा केन विलयमसन दुखापतीमुळे आऊट झाला. दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी
जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्स
प्रसिद्ध कृष्णा – राजस्थान रॉयल्स
झ्ये रिचर्डसन – मुंबई इंडियन्स
विल जॅक – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
ऋषभ पंत – दिल्ली कॅपिटल्स
श्रेयस अय्यर – कोलकाता नाईट रायडर्स
मुकेश चौधरी – चेन्नई सुपर किंग्ज
केन विल्यमसन – गुजरात टायटन्स
काइल जेमिसन – चेन्नई सुपर किंग्ज
जॉनी बेअरस्टो – पंजाब किंग्स