IPL 2023 : श्रेयस अय्यरनंतर शाहरुखच्या टीमला बसू शकतो आणखी एक झटका

IPL 2023 चा सीजन सुरु होण्याआधीच कोलकाता नाइट रायडर्सच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. शाहरुख खान-जुही चावलाच्या मालकीचा हा संघ या सीजनमध्ये अडचणींवर कशी मात करतो? त्याची उत्सुक्ता आहे.

IPL 2023 : श्रेयस अय्यरनंतर शाहरुखच्या टीमला बसू शकतो आणखी एक झटका
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 2:40 PM

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन सुरु होण्याआधीच अनेक फ्रेंचायजी खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. सीजनला सुरुवात होण्याआधीच अनेक प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतलीय. शाहरुख खान-जुही चावला यांच्या मालकीचा कोलकाता नाइट रायडर्स संघही याला अपवाद नाहीय. शाहरुख-जुहीचा संघ KKR ला खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच श्रेयस अय्यरच्या दुखापतीने केकेआरच टेन्शन वाढवलय. श्रेयस अय्यर कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन आहे.

बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयसचा पाठदुखीचा त्रास बळावला. त्यामुळे चौथ्या कसोटीत खेळूनही तो फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकला नाही. खरंतर या सीरीजच्या पहिल्या कसोटीत नागपूरमध्येही पाठदुखीमुळेच श्रेयस अय्यर खेळू शकला नाही. आता आयपीएलमधील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.

KKR च्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत

श्रेयस सीजन सुरु होण्याधी फिट व्हावा, अशी कोलकाता नाइट रायडर्सची इच्छा आहे. आता कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या दुखापतीने चिंता वाढवली आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे लॉकी काही सामन्यांना मुकू शकतो. श्रीलंकेविरुद्ध 25 मार्चला होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यातही तो खेळणार नाहीय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. फर्ग्युसनच्या बातमीमुळे केकेआरची चिंता वाढवली आहे.

ऑकलंडसाठी फर्ग्युसन चार सामने खेळला. त्यावेळी त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास सुरु झाला, अशी माहिती न्यूझीलंडच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली. मागच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला

केकेआर फर्ग्युसनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पॅट कमिन्स आणि टिम साऊदी यांना मागच्या सीजनमध्ये पावरप्लेमध्ये विकेट घेताना संघर्ष करावा लागला होता. मागच्या सीजनमध्ये लॉकी गुजरात टायटन्सकडून खेळला. त्याने 14 सामन्यात 12 विकेट काढल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.