IPL 2023 मध्ये एक कॅप्टनच टीमसाठी अडचण ठरतोय, फ्रेंचायजी त्याला कर्णधार पदावरुन हटवणार?

IPL 2023 Captaincy : IPL 2023 दरम्यान एका दिग्गज खेळाडूला नाईलाजाने कॅप्टनशिपवरुन हटवलं जाऊ शकतं. एका सीजनसाठी थोडे थोडके नव्हे, तब्बल 17 कोटी रुपये मिळतात.

IPL 2023 मध्ये एक कॅप्टनच टीमसाठी अडचण ठरतोय, फ्रेंचायजी त्याला कर्णधार पदावरुन हटवणार?
ipl
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:27 AM

IPL 2023 Captaincy : IPL 2023 दरम्यान एका दिग्गज खेळाडूला नाईलाजाने कॅप्टनशिपवरुन हटवलं जाऊ शकतं. IPL 2023 दरम्यान या कॅप्टमुळे टीमची अडचण वाढत चाललीय. IPL 2023 मध्ये एक अशी टीम आहे, ज्यांना आपल्या कॅप्टनमुळे नुकसान झेलाव लागतय. हा प्लेयर कॅप्टनशिप आणि बॅटिंग दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरतोय. अलीकडेच BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये या खेळाडूला डिमोशनचा सामना करावा लागला.

या दिग्गजाची कॅप्टनशिप जाणार ?

IPL 2023 मध्ये प्रभाव पाडू न शकलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलला मोठी किंमत चुकवावी लागू शकते. इंटरनॅशनल क्रिकेटनंतर आता आयपीएलमध्येही केएल राहुलची बॅट शांत आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात केएल राहुलने आतापर्यंत 8 आणि 20 धावा केल्या आहेत. केएल राहुलची खराब फलंदाजी लखनौ सुपर जायंट्ससाठी चिंतेचा विषय बनली आहे. काल लखनौ सुपर जायंट्सला चेन्नई सुपर किंग्सने 12 धावांनी हरवलं.

त्याने किती धावा केल्या?

चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 218 धावांच टार्गेट दिलं होतं. या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्सला आपला कॅप्टन केएल राहुलकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण तो या मॅचमध्ये फक्त 20 रन्स बनवून आऊट झाला. चेन्नईने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 217 धावा केल्या.

CSK vs LSG : MS Dhoni विजयानंतर चिडला, इम्पॅक्ट प्लेयरवर काढला राग, फोटो व्हायरल

कामगिरीत सुधारणा हवीच

प्रत्युत्तरात लखनौच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 205 धावा केल्या. केएल राहुल त्याच्या सुमार प्रदर्शनाच्या आधारावर लखनौ सुपर जायंट्सची दीर्घकाळ कॅप्टनशिप करु शकत नाही. केएल राहुल लवकर फॉर्ममध्ये परतला नाही, तर त्याला मध्यावरच कॅप्टनशिपवरुन हटवलं जाऊ शकतं.

सीरीज सुरु असताना पदावरुन हटवलं

केएल राहुलला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान टीमच्या उपकर्णधारपदावरुन हटवलं. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही ड्रॉप केलं. अलीकडेच BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्येही त्याला A ग्रेड वरुन B ग्रेडवर डिमोट करण्यात आलं. अशी परिस्थिती ओढवल्यास अडचण होईल

IPL मध्ये केएल राहुलला एका सीजनसाठी थोडे थोडके नव्हे, तब्बल 17 कोटी रुपये मिळतात. तो टीमचा कॅप्टन सुद्धा आहे. केएल राहुल लवकर फॉर्ममध्ये आला नाही, तर त्याला आयपीएलचा सीजन सुरु असतानाच कॅप्टनशिपवरुन हटवलं जाऊ शकतं. अशी परिस्थिती ओढवल्यास केएल राहुलची मोठी अडचण होईल.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....