KKR vs RCB 2023 : Andre russell पहिल्या बॉलवर OUT, पण बायकोने मारला SIX
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore 2023: इडन गार्डन्सवर आंद्रे रसेल खातं उघडू शकला नाही. पण त्याची बायको जैसिम लॉराचे फोटो मात्र जोरात व्हायरल होत आहेत.
KKR vs RCB 2023 : आयपीएलच्या 9 व्या मॅचमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला 81 धावांनी मोठा विजय मिळवला. पण या सामन्यात ऑलराऊंडर आंद्र रसेल फ्लॉप ठरला. रसेल पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. टीमला सर्वात जास्त आवश्यकता असताना आंद्रे रसेलने आपला विकेट गमावला. रसेल कर्ण शर्माच्या चेंडूवर खूप वाईट फटका खेळला. त्याने विराट कोहलीच्या हाती सोपा झेल दिला. आंद्रे रसेल फेल झाला. पण त्याची बायको जैसिमची सर्वत्र चर्चा आहे.
जैसिम लॉराची सोशल मीडियावर चर्चा होण्यामागे कारण आहे, तिने पोस्ट केलेला एक फोटो. कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानंतर तिने हा फोटो पोस्ट केला. जैसिमने या फोटोमध्ये बिकिनी परिधान केली आहे. तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घालून ती समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करतेय.
जैसिम कोण आहे?
जैसिम लॉरा अमेरिकेच्या मियामीची निवासी आहे. ती एक मॉडेल आहे. रसेलशी भेट होण्याआधी तिने अनेक मोठ्या प्रोजेक्टसवर काम केलय. अनेक ब्रांड्ससाठी फोटोशूट केलय. जैसिम अनेकदा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असते. पण सध्या ती भारतात नाहीय.
View this post on Instagram
जैसिमला कुठला ब़ॉलिवूड अभिनेता आवडतो?
जैसिम आणि रसेलच 2016 मध्ये लग्न झालं. 2014 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. दोघांना एक मुलगी आहे. जैसिमला भारत खूप आवडतो. शाहरुख खानचा तिचा फेव्हरेट बॉलिवूड कलाकार आहे. तो केकेआर टीमचा मालक सुद्धा आहे. जैसिमला क्रिस इवान आणि विल स्मिथ हे अभिनेते सुद्धा आवडतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
लॉरा आणि रसेलमध्ये बिनसलेलं?
मध्यंतरी जैसिम लॉरा आणि आंद्रे रसेलमध्ये वादावादी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. जैसिमच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन रसेलचा फोटो गायब होता. पण आता दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित असल्याच दिसतय. कारण जैसिमने आपल्या आडनावामागे रसेल जोडलय. रसेलकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा
नवरा आंद्रे रसेल आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करेल, अशी जैसिमला अपेक्षा असेल. आरसीबी विरुद्ध तो खातं उघडू शकला नाही. पण केकेआरने एकतर्फी विजय मिळवला. केकेआरला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करायच असेल, तर रसेलला चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.