LSG IPL 2023 : ‘अरे, बघा जरा तो माणूस….’ सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर KL Rahul ने सोडलं मौन

LSG IPL 2023 : KL Rahul ने ट्रोलिंगबद्दल त्याला काय वाटतं, ते स्पष्टपणे सांगितलं. 'द रणवीर शो' मध्ये बोलताना केएल राहुलने एक मोठी कबुली सुद्धा दिली. दुखापतीमुळे केएल राहुलला टुर्नामेंटच्या मध्यावर बाहेर पडाव लागलं.

LSG IPL 2023 : 'अरे, बघा जरा तो माणूस....' सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर KL Rahul ने सोडलं मौन
IPL 2023 KL RahulImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 12:33 PM

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने काल मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. दोन्ही टीम्ससाठी या सामन्यात विजय अत्यावश्यक होता. लखनऊची टीम नियमित कॅप्टन केएल राहुलशिवाय खेळत होती. IPL 2023 चा सीजन सुरु असताना केएल राहुलला दुखापत झाली. त्यामुळे तो टुर्नामेंटच्या मध्यावरच बाहेर पडला. केएल राहुल हा सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणारा, टीम इंडियाचा क्रिकेटपटू आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. केएल राहुल खेळला नाही किंवा खेळला, तरी सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं.

त्याचे वेगवेगळे मीम्स व्हायरल होतात. सोशल मीडियावर चालणाऱ्या या ट्रोलिंगबद्दल अखेर केएल राहुल व्यक्त झाला आहे. त्याने ट्रोलिंगबद्दल त्याला काय वाटतं? या बद्दल स्पष्ट सांगितलं.

‘द रणवीर शो’ मध्ये राहुल काय म्हणाला?

केएल राहुलला त्याचा स्ट्राइक रेट, फॉर्म आणि कर्णधार पदावरुन ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर सतत त्याची खिल्ली उडवली जाते. राहुल एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. ‘द रणवीर शो’ मध्ये बोलताना केएल राहुलने काही मुद्यांना स्पर्श केला. केएल राहुलने तो सोशल मीडिया ट्रोलिंगचा कशा पद्धतीने सामना करतो, त्याकडे कसं पाहतो, या बद्दल आपले विचार सांगितले.

‘दुसऱ्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होतो’

काही क्रिकेटर्स सोशल मीडिया ट्रोलिंगची अजिबात दखल घेत नाहीत. राहुलने ट्रोलिंगचा परिणाम होत असल्याची कबुली दिली. “ट्रोलिंगचा काही वेळा माझ्यावर परिणाम होतो. टीमच्या दुसऱ्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होतो. आम्हा क्रीडापटूंना तुमच्या पाठिंब्याची खूप गरज असते. आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार आहे, असं लोकांना वाटतं. तो माणूस कशातून चाललाय हे एकदा बघा” असं राहुल म्हणाला.

केएल राहुलवर अनेकदा बोचरी टीका

T20 वर्ल्ड कप 2022 नंतर नेटीझन्सनी सातत्याने केएल राहुलला टार्गेट केलय. त्याच्या फॉर्मवरुन त्याला सातत्याने टार्गेट केलं जातय. कोणाच्यातरी वशिल्यामुळे केएल राहुल टीममध्ये असल्याची त्याच्यावर सातत्याने टीका केली जाते. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी परफॉर्मन्सच्या मुद्यावरुन केएल राहुलवर अनेकदा बोचरी टीका केली आहे.

‘मी माझ्या बाजूने 200 टक्के देतो’

केएल राहुल वर्ष 2022 मध्ये कुठल्याही फॉर्मेटमध्ये शतक झळकवू शकला नाही. त्याला टेस्ट, वनडे आणि टी 20 च्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. राहुलसाठी हा खडतर काळ आहे. “मी माझ्या बाजूने 200 टक्के देतो, पण अपेक्षित निकाल मिळत नाही” असं राहुलने कबूल केलं. “आम्हाला कोणालाही वाईट खेळायचं नसतं. क्रिकेट हे आमचं आयुष्य आहे. क्रिकेटशिवया दुसर मला काही माहित नाही. मी तीच एक गोष्ट करतो” असं केएल राहुल म्हणाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.