LSG vs MI Dream 11 Team : पियुष चावला याला बनवा कर्णधार,तर या चार ऑलराउंडर्सचा संघात करा समावेश
आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तर दिल्लीनंतर सनराईजर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनऊ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 63 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल इतिहासात हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस लखनऊने विजय मिळवला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे. कारण प्लेऑफसाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात ड्रीम इलेव्हन कशी असेल याबाबत प्लानिंग सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला यातून काही मदत होऊ शकते. यामुळे तुम्हाला पैसे कमवण्यास मदत होऊ शकते.
लखनऊ विरुद्ध मुंबई या सामन्यात तुम्ही पियुष चावला याच्यावर डाव लावू शकता. अनुभवी गोलंदाज असून मुंबई इंडियन्ससाठी चांगलं प्रदर्शन करत आहे. या सिझनमध्ये पियुष चावलाने 12 सामन्यात 19 गडी बाद केले आहेत. उपकर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव किंवा क्विंटन डी कॉकची निवड करू शकता.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्यासाठी पिच रिपोर्ट
हा सामना लखनऊ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड इकाना स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. येथे पहिली फलंदाजी करताना 157 धावसंख्या होते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्यास पसंती दिली जाईल. या मैदानावर मागचा सामना लखनऊ आणि चेन्नई यांच्यात खेळला गेला. पण पावासामुळे हा सामना रद्द करण्यात आला. लखनऊने 19.2 षटकात 125 धावा केल्या होत्या. आयुष बडोनीने 33 चेंडूत 59 धावा केल्या होत्या.
लखनऊ विरुद्ध मुंबई ड्रीम इलेव्हन
विकेटकीपर- क्विंटन डीकॉक, ईशान किशन फलंदाज- सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), आयुष बडोनी अष्टपैलू- मार्कस स्टोईनिस, कृणाल पांड्या, प्रेरक मांकड, कॅमरुन ग्रीन गोलंदाज – पियुष चावला (कर्णधार), जेसन बेहरेनडोर्फ, रवि बिश्नोई
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लखनऊचा संघ : काइल मेयर्स, क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, रवि बिश्नोई, युधवीर सिंह, आवेश खान, अमित मिश्रा
मुंबईचा संघ : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल
दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.
लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युधवीर सिंह.