LSG vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना KL Rahul टीममध्ये हवाच, तोच लखनौला वाचवू शकला असता

LSG vs MI IPL 2023 : KL Rahul च लखनौ सुपर जायंट्सला मुंबई इंडियन्सपासून वाचवू शकतो. कारण मुंबई विरुद्ध राहुलची कामगिरीच तशी आहे. लखनौच्या अख्ख्या टीमला जमत नाही, ते एकटा राहुल करु शकतो.

LSG vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना KL Rahul टीममध्ये हवाच, तोच लखनौला वाचवू शकला असता
LSG IPL 2023 Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:12 AM

लखनौ : दुखापतीमुळे KL Rahul ला IPL 2023 चा सीजन संपण्याआधीच बाहेर पडाव लागलं. लखनौ सुपर जायंट्सला अजून राहुलची कमतरता जाणवली नसेल, पण आज नक्कीच जाणवू शकते. आज लखनौ सुपर जांयट्सचा मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना आहे. लखनौच्या इकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच रंगेल. लखनौच्या टीमला संकटापासून वाचवण्याची क्षमता फक्त केएल राहुलकडे आहे. कारण केएल राहुलशिवाय मुंबईला हरवणं, लखनौसाठी सोपं नाहीय.

IPL च्या पीचवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा 100 टक्के विजयाचा रेकॉर्ड आहे. पण, हे सुद्धा तितकच खरं आहे की, लखनौ सुपर जायंट्सच्या विजयात केएल राहुल हिरो ठरला आहे.

मुंबई विरुद्ध राहुलची बॅट चालते

IPL च्या मागच्या सीजनमध्ये मुंबई आणि लखनौच्या टीम दोनवेळा आमने-सामने आल्या होत्या. दोन्ही सामने लखनौने जिंकले होते. त्यावेळी केएल राहुलने शतकी खेळी केली होती. दोन्ही मॅचमध्ये केएल राहुल 103 धावा करुन तो नाबाद राहिला होता.

राहुलशिवाय लखनौ कसा करणार मुंबईचा सामना?

मुंबई विरुद्धच्या दोन्ही सामन्यात केएल राहुलची शतकी इनिंग सोडल्यास लखनौच्या बॅटिंगचा ग्राफ विशेष नाहीय. IPL 2022 मध्ये मुंबई आणि लखनौची टीम पहिल्यांदा आमने-सामने आली. लखनौने पहिली बॅटिंग करताना 199 धावा केल्या होत्या. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 103 धावा केल्या होत्या. IPL 2022 च्या दुसऱ्या सामन्यात लखनौने मुंबई विरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 168 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये केएल राहुलने 62 चेंडूत 12 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 103 धावा केल्या होत्या.

आज मुंबई इंडियन्सकडे चांगली संधी

IPL 2023 मध्ये आज या दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहेत. त्यावेळी केएल राहुल लखनौच्या टीममध्ये नसेल. मुंबई इंडियन्सकडे मागच्यावर्षीच्या दोन पराभवांचा हिशोब चुकता करण्य़ाची चांगली संधी आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमने विजय मिळवला, तर लखनौ सुपर जायंट्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीत पिछाडीवर पडेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लखनऊचा संघ : काइल मेयर्स, क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, रवि बिश्नोई, युधवीर सिंह, आवेश खान, अमित मिश्रा

मुंबईचा संघ : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.