IPL 2023 Video : सूर्यकुमार यादवची तिलक वर्मासोबत ‘ग्रँड मस्ती’, तोंड उघडं असताना केलं असं कृत्य
आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत मुंबईने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करत क्वॉलिफायर दोनमध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यानंतर संपूर्ण संघ अहमदाबादला रवाना झाला. मात्र प्रवासात सूर्यकुमार यादवची मस्ती तिलक वर्माला चांगलीच भोवली.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेचे आता फक्त दोन सामने उरले आहेत. त्यानंतर जेतेपदावर कोण नाव कोरतं ते स्पष्ट होईल. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सामना होणार आहे. एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने लखनऊ जायंट्सला 81 धावांनी पराभूत केलं. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगला होता. आता मुंबई इंडियन्स क्वॉलिफायर दोन सामना खेळण्यासाठी अहमदाबादला रवाना झाली आहे. मात्र या प्रवासात बऱ्याच गंमतीजमती घडल्या आहे. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादवच्या एका कृतीमुळे तिलक वर्माचं तोंड आंबट झालं असंच म्हणावं लागेल.
सूर्यकुमार यादव मैदानात बिनधास्तपणे खेळतो, तर त्याचा खोडकरपणा मैदानाबाहेर पाहायला मिळतो. त्याच्या खोडकरपणाचे अनेक किस्से समोर आले आहेत. आता व्हायरल व्हिडीओमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. झालं असं की, तिलक वर्मा फ्लाइटमध्ये झोपला होता. यावेळी त्याचं तोंड उघडं होतं. मग काय सूर्यकुमारमधील खोडकरपणा जागा झाला. सूर्यकुमार यादवने लगेच एअरहोस्टेसकडून लिंबू मागवला. तो लिंबू त्याने तिलक वर्माच्या तोंडात पिळला. आबंटपणा जाणवल्याने तिलक वर्माची झोप एका झटक्यात उडाली आणि चव चाखत चाखत जागा झाला.
Chain se sona hai toh jaag jao ???#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @surya_14kumar @TilakV9 MI TV pic.twitter.com/1SjiJtSSx7
— Mumbai Indians (@mipaltan) May 25, 2023
दुसरीकडे, मुंबईचा क्वॉलिफायर 2 मध्ये सामना गुजरातसोबत त्यांच्याच होम ग्राउंड होणार आहे. याच मैदानात साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात गुजरातने मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं होतं. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. गुजरातने 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावा केल्या होत्या. पण मुंबईचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 152 धावा करू शकला. मुंबईचा 55 धावांनी पराभव झाला होता.
दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.