Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : Rohit Sharma 1 वर्षापासून प्रतिक्षेत होता, विराट कोहलीकडून 17 बॉलमध्ये त्याचा गेम ओव्हर, VIDEO

MI vs RCB IPL 2023 : विराट कोहलीने रोहित शर्माला धक्का देत आपला मास्टर क्लास दाखवून दिला. विराट कोहलीच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे त्याने मुंबई इंडियन्सच्या शक्तीस्थळावरच हल्लाबोल केला.

MI vs RCB : Rohit Sharma 1 वर्षापासून प्रतिक्षेत होता, विराट कोहलीकडून 17 बॉलमध्ये त्याचा गेम ओव्हर, VIDEO
Virat kohli-Rohit sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 8:48 AM

MI vs RCB IPL 2023 : वर्षभरापूर्वी मागच्या सीजमध्ये विराट कोहली खूप सहज OUT होत होता. IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या विराट कोहलीला नवीन गोलंदाज सहज बाद करत होते. त्यावेळी विराट आकाशाकडे पाहून आपल्या नशीबाला दोष देत होता. मागच्या सीजनमध्ये विराटला स्वत:मधील टॅलेंटला न्याय देता येत नव्हता. रविवारी 2 एप्रिलला IPL 2023 च्या सीजनमध्ये विराटने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला. अनेक रेकॉर्ड्स ज्या बॅट्समनच्या नावावर आहेत, तशीच बॅटिंग त्याने केली.

विराट कोहलीसमोर मोठ-मोठे गोलंदाज टेन्शमध्ये येतात. काल विराटने आपल्या फलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या शक्तीस्थळावरच हल्लाबोल केला. त्यातून विराटची प्रतिभा दिसून आली.

मुंबई इंडियन्सला मिळाली वाईट बातमी

सीजन सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला वाईट बातमी मिळाली. त्यांचा स्टार पेस बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टुर्नामेंटच्या बाहेर गेला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स यंदाच्या सीजनमध्ये बुमराह आणि जोफ्रा आर्चर या जोडीला एकत्र गोलंदाजी करताना पाहणार नाहीत. मागच्या सीजनमध्ये आर्चर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या.

MI vs RCB : पहिली हार, वैतागला Rohit Sharma, पराभवासाठी दिली ‘ही’ कारणं

संधी गमावली, त्यानंतर कोहलीने आर्चरला संधी दिली नाही

जोफ्रा आर्चरच पुनरागमन त्याला जास्त टेन्शन देणारं ठरलय. या मॅचला आर्चर विरुद्ध कोहली असं पाहिलं जात होतं. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आधीच कमकुवत वाटत होती. मुंबई टीमला आर्चरकडून दमदार प्रदर्शनाची अपेक्षा होती. पण असं झालं नाही. आर्चरकडे कोहलीला पहिल्याच चेंडूवर आऊट करण्याची संधी होती. पण तो वेगात आलेली कॅच पकडू शकला नाही. त्यानंतर कोहलीने आर्चरला संधी दिली नाही.

कोहली विरुद्ध आर्चर, कोण कोणावर भारी?

विराट कोहलीने आर्चरच्या पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर आर्चर समोर आला, तेव्हा कोहलीने पुन्हा एकदा चौकार आणि षटकार खेचला. आर्चरने या मॅचमध्ये 4 ओव्हर बॉलिंग केली. त्याने 24 चेंडूत 33 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाली नाही. त्याने 24 पैकी 17 चेंडू कोहलीला टाकले. त्याने 7 चेंडूंवर रन्स निघाले नाहीत.

उर्वरित 10 बॉल्समध्ये कोहलीने आर्चरला 2 सिक्स आणि 2 फोर मारले. कोहलीने आर्चरच्या बॉलिंगवर 28 धावा वसूल केल्या. आर्चर विरुद्ध कुठल्याही टी 20 मॅचमध्ये एका बॅट्समनने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

आर्चरच चालणं आवश्यक

जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. दुखापतीमुळे तो मागचा सीजन खेळू शकला नव्हता. मुंबई इंडियन्सला जिंकायच असेल, तर जोफ्रा आर्चरचा चालणं आवश्यक आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.