AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 MI vs RR Live Streaming | मुंबई-राजस्थान आमनेसामने, कोण करणार ‘हल्लाबोल’?

Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Streaming | मुंबई इंडियन्सला या हंगामात आपली विजयी घोडदौड कायम राखण्यात अपयश येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान सरस ठरतेय.

IPL 2023 MI vs RR Live Streaming | मुंबई-राजस्थान आमनेसामने, कोण करणार 'हल्लाबोल'?
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 8:12 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 30 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला आमि मोसमातील 41 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि एकूण 42 वी मॅच ही मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदा भिडणार आहेत. आयपीएल पहिला टप्पा संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने 7 पैकी 3 वेळा प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या आणि मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईने शेवटचे 2 सामने गमावले आहेत. तर राजस्थानने आपला अखेरचा सामना जिंकला आहे. या सामन्यानिमित्ताने आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई विरुद्ध राजस्थान सामना कधी आणि कुठे?

मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना 30 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात?

मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार.

लाईव्ह सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्याचं स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.

डिजीटल स्ट्रीमिंग कुठे बघता येणार?

क्रिकेट चाहत्यांना मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना जिओ एपवर मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. विशेष म्हणजे एकूण 12 भाषांमध्ये सामन्यासह कॉमेंट्री ऐकता येणार आहे.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार), अब्दुल बसिथ, मुरुगन अश्विन, रविचंद्रन अश्विन, केएम आसिफ, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, केसी करियप्पा, युजवेंद्र चहल, डोनोवन फरेरा, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, ओबेड मॅककॉय , देवदत्त पडिक्कल, रियान पराग, कुणाल सिंह राठोड, जो रूट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव आणि एडम जम्पा.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.