IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर….

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर विराट कोहली आतून तुटला. मैदानावरच डोळ्यात तरळले अश्रू. विराट कोहलीच्या RCB टीमला मागच्या 16 वर्षात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर....
RCB lost From GT IPL 2023
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 12:16 PM

बंगळुरु : IPL 2023 चा शेवटचा टप्पा खूपच रंगतदार झाला. शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 6 विकेट राखून विजय मिळवला. गुजरातच्या या विजयामुळे RCB फॅन्सच कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. या मॅचमध्ये दोन सेंच्युरी पहायला मिळाल्या. एक शतक विराट कोहलीने तर दुसरी सेंच्युरी धावांचा पाठलाग करताना ओपनर शुभमन गिलने झळकवली.

शुभमन गिल या मॅचमध्ये शानदार नाबाद 104 धावांची शतकी इनिंग खेळला. गिलने बॅक टू बॅक शतकं झळकावली आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा आगामी प्लेऑफचा सामना खूपत इंटरेस्टिंग असेल, हे गिलने स्पष्ट केलय.

विराट कोहली भावूक

या पराभवासह RCB चा स्पर्धेतील प्रवास इथेच थांबला. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये खेळणारी चौथी टीम आहे. या मॅचनंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिससह मोहम्मद सिराज आणि विराट कोहली भावूक झाले. डग आऊटमध्ये बसलेला विराट कोहली शुभमन गिलच्या बॅटमधून निघालेला मॅच विनिंग सिक्स पाहून निराश झाला. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं.

आयपीएलमध्ये RCB सतत अपयशी

विराट कोहलीला इमोशनल होताना पाहून त्याचे फॅन्स सुद्धा भावूक झाले. आयपीएलचे 15 सीजन झालेत. हा 16 वा सीजन होता. पण आतापर्यंत एकदाही RCB च्या टीमला विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. हरुनही कोहलीने रचला इतिहास

RCB या मॅचमध्ये हरली. पण विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. त्याने 101 धावा फटकावल्या. विराट कोहलीने ख्रिस गेलला मागे टाकलं. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक 7 सेंच्युरी झळकवणारा फलंदाज बनला आहे. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सुद्धा आहे. पण अजून विजेतेपद कोहलीच्या नशिबी आलेलं नाहीय.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.