IPL 2023 : MS Dhoni Retirement बद्दल CSK च्या सीईओकडून महत्वाची अपडेट

IPL 2023 : MS Dhoni Retirement बद्दल CSK च्या CEO ने नेमकं काय सांगितलं? धोनीने पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सना बुचकळ्यात टाकलं आहे. धोनीची पुढची चाल काय असेल? या बद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जातायत.

IPL 2023 : MS Dhoni Retirement बद्दल CSK च्या सीईओकडून  महत्वाची अपडेट
Ajinkay rahane-MS Dhoni
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 1:47 PM

चेन्नई : CSK चा कॅप्टन MS Dhoni चा IPL 2023 हा शेवटचा सीजन आहे का? तो रिटायर होणार का? तो क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार का? धोनी घरच्या चेपॉकच्या मैदानात आयपीएल करियरमधला शेवटचा सामना खेळला का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामागे कारण आहे, काल रात्री चेपॉकवर KKR विरुद्ध मॅच झाल्यानंतर मैदानात घडलेल्या घडामोडी. धोनीने पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सना बुचकळ्यात टाकलं आहे.

धोनीची पुढची चाल काय असेल? या बद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जातायत. चेन्नई सुपर किंग्सेच सीईओ काशी विश्वनाथन यांना सुद्धा धोनीचा पुढचा निर्णय काय असेल? याची कल्पना नाहीय. ते सुद्धा खात्रीशीरपणे काही सांगू शकत नाहीत.

सीएसकेचे CEO काय म्हणाले?

भविष्याबद्दल कुठलाही निर्णय घेण्याआधी थाला म्हणजेच धोनी अजून एक सीजन खेळेल, अशी सीएसकेच्या ड्रेसिंग रुमची आणि मॅनेजमेंटची इच्छा आहे. “धोनी पुढच्या सीजनमध्ये सुद्धा खेळेल, असा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येकवेळी मिळतो, तसा आम्हाला फॅन्सचा पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा आहे” असं सीएसकेचे CEO काशी विश्वनाथन म्हणाले. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

सगळी टीम चेपॉकवर आभार मानत होती, त्यावेळी….

धोनीचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. संपूर्ण सीजनमध्ये धोनी गुडघे दुखापतीने त्रस्त दिसला. अजून तो त्यातून सावरलेला नाही. रविवारी रात्री सीएसकेची संपूर्ण टीम चेपॉकवर प्रेक्षकांचे आभार मानत असताना, धोनीला होणारा गुडघे दुखापतीचा त्रास दिसत होता. त्याच्या गुडघ्यांना आईसपॅक बांधलेला होता.

धोनी-धोनीचा गजर सुरु होता

काल रात्री चेपॉक स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं होतं. पिवळी जर्सी परिधान करुन CSK चे पोस्टर्स हातात घेऊन हजारो फॅन्स बसले होते. माहीने संपूर्ण टीमसोबत ग्राऊंडला फेरी मारली. माहीने रॅकेट हातात घेऊन प्रेक्षक स्टँडमध्ये टेनिस बॉल मारुन आभार मानले. संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा गजर सुरु होता. हा सर्व घटनाक्रम धोनीची आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईमध्ये शेवटची मॅच होती, याकडे इशारा करत होती. त्यामुळे धोनी रिटायर होणार का? या चर्चेने जोर धरलाय. धोनीचा रोल परफेक्ट

धोनी कॅप्टन म्हणून आपली भूमिका चोख बजावतोय. त्यामुळे सीएसकेची टीम चांगली खेळतेय. अजून एक-दोन विजयानंतर ते प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकतात. धोनी प्रत्येक खेळाडूचा अचूक पद्धतीने वापर करतोय. त्यामुळे सीएसकेच या सीजनमध्ये चांगलं प्रदर्शन पहायला मिळालय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.