Rohit Sharma : 15 मॅचमध्ये इतक्या धावा, IPL मध्ये घसरतोय रोहित शर्माचा ग्राफ, 2 वर्षात अशी झाली हालत

IPL 2023 Rohit sharma News : रोहित शर्माने RCB विरुद्ध 1 धाव करण्यासाठी 10 चेंडू घेतले. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स टीम दोघांचा ग्राफ एकाचवेळी घसरतोय. रोहित शर्माच्या मागच्या दोन वर्षातील परफॉर्मन्सवर एक नजर टाका.

Rohit Sharma : 15 मॅचमध्ये इतक्या धावा, IPL मध्ये घसरतोय रोहित शर्माचा ग्राफ, 2 वर्षात अशी झाली हालत
rohit-sharmaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 11:30 AM

IPL 2023 Rohit sharma News : मुंबई इंडियन्सच्या टीमला आयपीएल 2023 मध्ये पहिल्या विजयासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमला पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने वाईट पद्धतीने मुंबई इंडियन्सला हरवलं. या मॅचमध्ये पुन्हा एकदा रोहित शर्माचा फ्लॉप शो पहायला मिळाला. त्याने फक्त 1 रन्स केला. त्यासाठी रोहितला 10 चेंडू लागले. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि कॅप्टन रोहित शर्मा दोघांचा ग्राफ घसरत चाललाय.

2020 मध्ये मुंबई टीमने आपलं पाचव विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2021 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम 5 व्या आणि 2022 सीजनमध्ये 10 व्या नंबरवर तळाला होती. मागच्या 2 वर्षात मुंबई इंडियन्स टीमच्या ग्राफमध्ये घसरण झाली आहे.

रोहितच्या कामगिरीतही घसरण

त्याचबरोबर रोहितच्या प्रदर्शनात सुद्धा घसरण होतेय. आयपीएलच्या मागच्या 15 इनिंगमध्ये रोहितच्या बॅटमधून फक्त 269 धावा निघाल्या आहेत. मागच्या सीजनच्या 14 आणि या सीजनमधील एक मॅच आहे. या दरम्यान त्याची सरासरी 17.93 आणि स्ट्राइक रेट 115.4 आहे.

Mumbai Indians चे 17.50 कोटी पाण्यात जाणार? मुंबईसाठी ठरला मोठा विलन

15 इनिंगमध्ये रोहितने किती हाफ सेंच्युरी झळकवल्या?

मागच्या 15 डावात रोहितची बेस्ट इनिंग 48 धावांची आहे. यात एकही अर्धशतक नाहीय. आयपीएलमध्ये त्याने शेवटच अर्धशतक 2021 मध्ये झळकवल होतं. 2021 मध्ये त्याने 13 सामन्यात 381 धावा फटकावल्या होत्या. यात एक अर्धशतक होतं. 2009 वर्ष सोडल्यास, रोहितने सर्व सीजनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अर्धशतक झळकवली आहेत.

2009 मध्ये रोहितने फक्त एकच हाफसेंच्युरी झळकवली होती. 2009 ची कसर त्याने 2010 मध्ये भरुन काढली होती. त्याने 16 मॅचमध्ये 3 हाफ सेंच्युरीसह 404 धावा फटकावल्या. पण आता सुधारण्याऐवजी त्याच्या कामगिरीत आणखी घसरण होतं चाललीय. रोहितसाठी सर्वात खराब सीजन

2021 च्या सीजनमध्ये रोहित शर्माने कमीत कमी एक अर्धशतक झळकवल होतं. पण 2022 चा सीजन त्याच्यासाठी खूपच खराब ठरला. त्याने 14 इनिंगमध्ये फक्त 268 धावा काढल्या. चालू सीजनच्या पहिल्याच सामन्यात रोहित फ्लॉप ठरलाय. एकाही अर्धशतकाशिवाय त्याच्या 15 इनिंग झाल्या आहेत. आयपीएलच्या या सीजनमध्ये तो धावांचा दुष्काळ संपवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.