Akash Madhwal IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा स्टार आकाश मधवालवर ‘या’ लीगमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी

Akash Madhwal IPL 2023 : आकाश मधवालवर बंदी का घातली?. आकाश मधवालने डेब्यु सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. आपल्या परफॉर्मन्सने त्याने लक्ष वेधून घेतलय. आकाश मधवालने 5 विकेट काढल्या.

Akash Madhwal IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा स्टार आकाश मधवालवर 'या' लीगमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी
Akash Madhwal IPL 2023Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 12:26 PM

रुरकी : सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात एका नव्या ताऱ्याची चर्चा आहे. त्याचं नाव आहे आकाश मधवाल. एलिमिनेटच्या महत्वाच्या सामन्यात या बॉलरने कमाल केली. त्यांनी 3.3 ओव्हर्समध्ये 5 धावा देऊन लखनऊच्या 5 विकेट काढल्या. आयपीएलमध्ये प्लेऑफच्या इतिहासात 5 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. आकाश मधवालने डेब्यु सीजनमध्ये ही कामगिरी केलीय.

आकाश मधवाल आज आयपीएल गाजवतोय. पण 2018 पर्यंत तो टेनिस बॉल प्लेयर होता. रुरकीमध्ये आकाशच्या गोलंदाजीची दहशत होती. आज आकाशची आई आणि भाऊच नाही, संपूर्ण धंधेरा शहर आकाशच यश साजर करतय.

आकाशच्या भावाने कोणाला क्रेडिट दिलं?

आकाशच्या परफॉर्मन्सनंतर गुरुवारी सकाळी धंधेरामधील आकाशच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची रांग लागली होती. आकाशच्या वतीने त्याचा भाऊ आशिष शुभेच्छांचा स्वीकार करत होता. दबावाच्या प्रसंगात रोहित शर्माच्या मदतीमुळे आपला भाव चांगली कामगिरी करु शकला, असं आशिषने सांगितल. तो इंडिया टुडेशी बोलत होता.

आता त्या विश्वासाची परतफेड

“रोहित भाई खेळाडूंना संधी देतात. ते प्लेयरवर विश्वास ठेवतात. त्याला पाठिंबा देतात. नव्या खेळाड़ूला संघातील त्याच्या स्थानाची चिंता असते. रोहित शर्माने ती भिती दूर केली आणि आकाश आज परफॉर्म करतोय” असं आशिष म्हणाला. “मुंबई इंडियन्सने आकाशवर 2022 मध्ये विश्वास टाकला. आकाश आता त्या विश्वासाची परतफेड करतोय” असं आशिष म्हणाला.

आकाश टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा

आकाश आणि आशिष दोघे भाऊ क्रिकेट खेळत मोठे झाले. इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर आकाशकडे नोकरी होती. पण तो क्रिकेटला आपल्या आयुष्यातून बाजूला काढू शकला नाही. आकाश जिथे रहातो, तिथे टेनिस बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंटस होतात. आकाश तिथे बरच टेनिस क्रिकेट खेळलाय.

दरदिवशी लोक घरी यायचे

“इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर आकाशला नोकरी लागली होती. त्यावेळी दरदिवशी लोक घरी यायचे व आकाशला क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायचे. कामावर जाऊ नकोस, आमच्या टीमकडून क्रिकेट खेळं. आम्ही तुला पैसे देऊ असं त्याला सांगायचे. उत्तराखंडमध्ये टेनिस क्रिकेट खेळता, खेळतो, तो सीजन क्रिकेटकडे वळला” असं आकाशच्या स्थानिक मित्रांनी सांगितलं.

गोलंदाजीची दहशत होती

“आकाश उत्तराखंडमध्ये टेनिस क्रिकेट खेळताना इतकी जबरदस्त गोलंदाजी करायचा की, त्याच्यावर स्थानिक लीगमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली” असा आशिष मधवालने सांगितलं. तो पेशाने बिझनेसमन आहे. “त्याच्या गोलंदाजीची दहशत होती. स्थानिक लीग क्रिकेटमध्ये त्याच्या खेळण्यावर बंदी होती. त्यामुळे आकाश रुरकीच्या बाहेर जाऊन खेळायचा” असं आशिषने सांगितलं. IPL 2023 मध्ये आकाश मधवालने 7 सामन्यात 13 विकेट घेतलेत. आज गुजरात टायटन्स विरुद्ध होणाऱ्या क्वालिफायर 2 सामन्याच्यावेळी त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.