GT vs CSK : धोनीच्या 48 कोटींच्या चार टॉप प्लेयरवर हार्दिक पंड्याचा एक पहलवान पडेल भारी

GT vs CSK : गुजरात टायटन्सचा एक प्लेयर धोनीच्या चेन्नईला पाठवू शकतो घरी. त्याची क्षमता आणि रेकॉर्डच तसा आहे. त्यामुळे धोनीच्या चेन्नईला त्याच्यासमोर जरा जपूनच खेळाव लागेल.

GT vs CSK : धोनीच्या 48 कोटींच्या चार टॉप प्लेयरवर हार्दिक पंड्याचा एक पहलवान पडेल भारी
CSK playersImage Credit source: csk Twitter
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 11:36 AM

GT vs CSK IPL 2023 : बेन स्टोक्सची किंमत 16.25 कोटी, रवींद्र जडेजाची किंमत 16 कोटी, महेंद्र सिंह धोनीची किंमत 12 कोटी आणि शिवम दुबेची किंमत 4 कोटी रुपये. चेन्नई सुपरकिंग्सच्या या चार खेळाडूंची मिळून किंमत होते 48.25 कोटी रुपये. हे खेळाडू आपल्या बळावर चेन्नईला विजय मिळवून देऊ शकतात. पण गुजरात टायटन्सचा एक खेळाडू या चौघांवर भारी आहे. गुजरातच्या या खेळाडू समोर चेन्नईच्या मधल्या फळीच फार काही चालत नाही. गुजरातच्या या गोलंदाजासमोर चेन्नईच्या मोठे प्लेयर हतबल होतात.

चेन्नई सुपर किंग्स टीमने चारवेळा आयपीएलच विजेतेपद मिळवलं आहे. गुजरात टायटन्सने एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या दोन टीम्समध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स चेन्नईवर भारी पडली आहे.

धोनी-स्टोक्सच काही चालत नाही

चेन्नई सुपर किंग्सवर भारी पडणाऱ्या गुजरात टायटन्सच्या या खेळाडूच नाव आहे, राशिद खान. तो चेन्नईसाठी सर्वात धोकादायक ठरु शकतो. त्याच्या आकडेवारीवरुन ही गोष्ट स्पष्ट होते. लांबलचक सिक्स मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध बेन स्टोक्स, धोनीच राशिदसमोर काही चालत नाही.

त्याच्या बॉलिंगसमोर मीडल ऑर्डरचा स्ट्राइक रेट काय?

राशिद खानचा चेन्नई सुपर किंग्सच्या या चार खेळाडूंविरोधात कमालीचा रेकॉर्ड आहे. बेन स्टोक्सचा राशिद खान विरोधात स्ट्राइक रेट 61.1 चा आहे. रवींद्र जाडेजा राशिद विरोधात फक्त 69.2 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवतो. धोनीचा राशिद खान विरोधात स्ट्राइक रेट 68.6 आहे. शिवम दुबेचा स्ट्राइक रेट 50 चा आहे.

T20 क्रिकेटमध्ये तो किंग आहे

टी 20 क्रिकेटमध्ये राशिद खानचा जलवा आहे. त्याच्या गोलंदाजीवर धावा बनवणं सोपं नाहीय. आयपीएलमध्ये राशिद खानच प्रदर्शन एका वेगळ्या लेव्हलच असतं. आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जलवा

राशिद खानने आयपीएलच्या 92 सामन्यात 112 विकेट काढल्या आहेत. प्रतिओव्हर त्याचा इकॉनमी रेट 6.38 चा आहे. मागच्यावर्षी राशिद खानने 16 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या होत्या. त्या सीजनमध्ये सुद्धा त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 7 पेक्षा कमी होता. राशिद खानने आपल्या बॅटची सुद्धा ताकत दाखवलीय. मागच्या सीजनमध्ये राशिद खानने 22.75 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात तो चेन्नईसाठी धोकादायक ठरु शकतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.