RCB-RR Play-off Chance : पराभव पंजाबचा, टेन्शन बंगलोरला; प्लेऑफमधील एन्ट्रीसाठी कितवा नंबर हवा?
राजस्थान आणि बंगोलरचे पॉइंट्स बरोबर झाले आहेत. दोघांचेही पॉईंट्स प्रत्येकी 14 आहेत. त्यामुळे बंगलोरला प्लेऑफच्या रेसमध्ये अजून एक स्पर्धक मिळाला असून हा स्पर्धक बंगोलरच्या टीमसाठी धोकादायकही ठरू शकतो.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी आयपीएल 2023 सीजनच्या प्लेऑफची लढाई शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. शेवटच्या चार मॅच प्लेऑफमध्ये उरलेल्या तीन स्थानांच्या भविष्याचा फैसला करणार आहे. यातील सर्वात शेवटच्या सामन्यावर बरंच काही अवलंबून असेल. किमान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्सच्या भविष्याचा फैसला या मॅचवर अवलंबून असणार आहे. पंजाबच्या पराभवानंतर ही स्थिती निर्माण झाली असून बंगलोरला प्लेऑफच्या एन्ट्रीचं टेन्शन आलं आहे.
शुक्रवारी धर्माशाला येथे पंजाब किंग्सचा शेवटचा सामना पार पडला. यावेळी पंजाबला राजस्थान रॉयल्सकडून 4 विकेटने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे पंजाबला सामन्यातीन बाहेर पडावं लागंल आहे. त्यामुळे राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण राजस्थान आणि बंगोलरचे पॉइंट्स बरोबर झाले आहेत. दोघांचेही पॉईंट्स प्रत्येकी 14 आहेत. त्यामुळे बंगलोरला प्लेऑफच्या रेसमध्ये अजून एक स्पर्धक मिळाला असून हा स्पर्धक बंगोलरच्या टीमसाठी धोकादायकही ठरू शकतो. पाचवा नंबरच आता बंगलोरला प्लेऑफमध्ये एन्ट्री देणार आहे.
काय घडलं?
पंजाब आणि राजस्थान आपली शेवटची मॅच खेळत होते. दोघांचेही पॉइंट्स 12 होते. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याचे पॉइंट्स 14 होणार होते. फक्त पंजाब जिंकला असता तर बंगलोरसाठी टेन्शन नव्हते. राजस्थानच्या विजयामुळे हे टेन्शन वाढलं आहे. त्याचं कारण म्हणजे नेट रन रेट. पंजाबचा एनआरआर आधीपासूनच खराब होता. या विजयाने काहीच फरक पडला नसता. पण राजस्थानचा रनरेट आधीपासूनच चांगला होता. शिवाय राजस्थानचा रनरेट बंगोलरच्या नजदीक होता. पंजाबविरुद्धच्या विजयामुळे राजस्थानचा रन रेट बंगलोरच्या अधिकच जवळ आला आहे.
रन रेटचा सर्व खेळ
सर्व खेळ याच रन रेटचा आहे. कारण बंगलोर आणि राजस्थान शिवाय मुंबईचेही 14 पॉइंट्स आहेत. त्यात बंगलोर रनरेटमुळे सर्वात वर आहे. तर मुंबईचा रन रेट सर्वात खराब आहे. परंतु मुंबई आणि बंगलोरचा अजून एक एक सामना बाकी आहे. जर पंजाब जिंकली असती तर पंजाबचा रन रेट या तीन संघांपेक्षाही खराब असता. या सर्व परिस्थितीत मुंबई जर हैद्राबादसोबतच्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाली तसेच बंगलोरही शेवटचा सामना जिंकण्यात अपयशी ठरली तरीही चांगल्या रन रेटमुळे ते बंगलोरची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली असती.
राजस्थानच्या या विजयाने बंगलोरच्या आशेवर पाणी फेरले आहे. मुंबईने शेवटचा सामना गमावला तरी बंगलोरचं टेन्शन दूर होणार नाही. त्यामुळे बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावं लागणार आहे. तसं नाही झाल्यास गुजरात सोबत कमी फरकाने पराभूत व्हावे लागेल. एनआरआरच्या आकडेवारीनुसार, जर बंगलोर पाच किंवा अधिक धावांनी पराभूत झाल्यास नेट रन रेटमध्ये बंगलोर राजस्थानच्या मागे पडेल. त्यामुळे संजू सॅमसनचा संघ शेवटच्या चारमध्ये आपलं स्थान बळकट करेल. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.