IPL 2023 Playoff Scenario : चेन्नई आणि मुंबईचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात ‘या’ 2 टीम्स

IPL 2023 Playoff Scenario : सगळ्यांना वाटतय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम प्लेऑफमध्ये आरामात पोहोचेल. पण आयपीएलमधल्या दोन टीम्स मुंबई आणि चेन्नईचा खेळ बिघडवू शकतात.

IPL 2023 Playoff Scenario : चेन्नई आणि मुंबईचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात 'या' 2 टीम्स
mumbai indians
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 1:18 PM

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सची टीम IPL 2023 मध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरलाय. गुजरात टायटन्सने सोमवारी रात्री सनरायजर्स हैदराबादच्या टीमला 34 धावांनी हरवलं. या विजयासह गुजरातने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं. गुजरात टायटन्सनंतर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणाऱ्या अन्य 3 टीम्स कुठल्या असणार? त्याची उत्सुक्ता आहे.

IPL 2023 मध्ये दोन टीम्स चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात. चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करायच असेल, तर काहीही करुन शेवटचा सामना जिंकावा लागेल. IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे 13 मॅचमध्ये 15 पॉइंट्स आहेत.

मुंबईचे शेवटचे दोन सामने कोणाबरोबर ?

तेच मुंबई इंडियन्सचे 12 मॅचमध्ये 14 पॉइंट्स आहेत. चेन्नई सुपर किंग्सला आपला शेवटचा लीग सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचा आहे. तेच मुंबई इंडियन्सला आपले शेवटचे दोन लीग सामने लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळायच आहेत.

चेन्नईला जिंकावच लागेल

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 12 मॅचमध्ये 12 पॉइंट आहेत. पंजाब किंग्सचे सुद्धा 12 सामन्यात 12 पॉइंट आहेत. चेन्नई सुपर किंग्स टीमने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपला शेवटचा सामना गमावला, तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतात. मुंबई इंडियन्सची टीम सुद्धा लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध हरली, तर त्यांची सुद्धा तीच हालत होईल. त्यांचाही प्लेऑफमधून पत्ता कट होऊ शकतो. मुंबई, चेन्नईच्या जागी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या दोन टीम्स कुठल्या?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपले शेवटचे दोन सामने जिंकले, तर त्यांचे 14 मॅचमध्ये 16 पॉइंट्स होतील. पंजाब किंग्सने सुद्धा शेवटचे दोन सामने जिंकले, तर त्यांचे सुद्धा 14 सामन्यात 16 पॉइंट्स होतील. अशी स्थितीत 16-16 पॉइंट्ससह पंजाब आणि बँगलोरची टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.