IPL 2023 Points Table : मुंबईवर एकतर्फी विजय, पण तरीही RCB टॉपवर नाही, जाणून घ्या कोण नंबर-1

IPL 2023 Points Table in Marathi : आयपीएल 2023 मध्ये सर्वच टीम्सनी आपआपला एक सामना खेळला आहे. त्यानंतर पॉइंट टेबलच चित्र स्पष्ट झालय. नंबर 1 कुठली टीम आहे, ते चित्र सुद्धा स्पष्ट आहे.

IPL 2023 Points Table : मुंबईवर एकतर्फी विजय, पण तरीही RCB टॉपवर नाही, जाणून घ्या कोण नंबर-1
Mi vs rcb
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 10:07 AM

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा काल तिसरा दिवस झाला. सर्वच टीम्सनी आपला एक-एक सामना खेळलाय. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम्सनी विजय मिळल्याच पहायला मिळालं होतं. अपवाद फक्त राजस्थान रॉयल्सचा. त्यांनी रविवारी सनरायजर्स हैदराबाद टीमला त्यांच्याच घरात हरवलं. रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानात चिन्नास्वामी स्टेडियमवर हरवलं. या मॅचनंतर पॉइंट्स टेबलच चित्र स्पष्ट झालय.

राजस्थानने हैदराबादला 72 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. त्यानंतर रविवारी दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डु प्लेसीची जलवा पहायला मिळाला. दोघे शानदार इनिंग खेळले. त्या बळावर RCB ने मुंबई इंडियन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. बँगलोरची टीम कोविडमुळे आपल्या घरच्या मैदानावर तीन वर्षांपासून एकही मॅच खेळली नव्हती.

पहिल्या स्थानावर कुठली टीम?

घराबाहेर विजय मिळवारी राजस्थान रॉयल्स पहिली टीम ठरली. त्यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 203 धावा फटकावल्या. 200 धावसंख्या पार करणार राजस्थान सीजनमधला पहिला संघ ठरला. हैदराबाद टीमने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावा केल्या. राजस्थान टीमला या विशाला विजयाचा फायदा मिळाला. पॉइंट्स टेबलमध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत. त्यांचे दोन पॉइंट्स आहेत.

टीम सामना विजय पराजय नेट रनरेट पॉइंट्स
राजस्थान रॉयल्स 321+2.0674
लखनौ सुपर जायंट्स 321+1.3584
गुजरात टायटन्स 220+0.7004
चेन्नई सुपर किंग्स321+0.3564
पंजाब किंग्स 220+0.3334
कोलकता नाइट रायडर्स 211+2.0562
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 211-1.2562
मुंबई इंडियन्स 202-1.3940
दिल्ली कॅपिटल्स 303-2.0920
सनरायजर्स हैदराबाद 202-2.8670
एकतर्फी विजय मिळवूनही RCB दुसऱ्या स्थानावर नाही

दुसऱ्या स्थानावर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारी लखनौ सुपर जायंट्सची टीम आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. तिसऱ्या नंबरवर आरसीबी आहे. चौथ्या नंबरवर गुजरात टायटन्सची टीम आहे. पाचव्या स्थानावर शिखर धवनची पंजाब किंग्स आहे. या सर्व टीम्सना एक मॅच जिंकल्यानंतर दोन-दोन पॉइंट्स मिळाले आहेत. नेट रनरेटच्या फरकामुळे कुठली टीम एक नंबरला तर दुसरी टीम दोन नंबरला आहे. चेन्नई आणि मुंबईची टीम कितव्या नंबरवर ?

चेन्नई आणि मुंबईची टीम मागच्या सीजनमध्ये दमदार कामगिरी करु शकली नव्हती. पॉइंट्स टेबलमध्ये या दोन टीम्स तळाला होत्या. या सीजनमध्येही मुंबई, चेन्नईने चांगली सुरुवात केलेली नाही. चेन्नईला आयपीएल 2023 मध्ये पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने हरवलं. ते सातव्या नंबरला आहेत. मुंबईची टीम आठव्या नंबरला आहे. सहाव्या नंबरवर कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्लीची टीम नवव्या नंबरवर आहे. घरच्या मैदानावर हरणारी हैदराबादची टीम तळाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.