Dinesh Karthik | आरसीबीच्या धमाकेदार विजयानंतर दिनेश कार्तिक याच्यासाठी सर्वात वाईट बातमी
राजस्थान रॉयल्स विरुद्ध 112 धावांनी विजय झाल्याने आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला. मात्र दिनेश कार्तिक याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
जयपूर | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने राजस्थान रॉयल्स टीमचा 112 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने राजस्थानला 172 रन्सचं टार्गेट दिलं होतं. राजस्थान टीम या विजयी धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. मात्र राजस्थानचा बाजार 10.3 ओव्हरमध्ये अवघ्या 59 धावांवरच उठला. राजस्थानवर मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र टीममधील अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक याच्यासाठी वाईट बातमी आल्याने या आनंदावर विरजन पडलं. दिनेश कार्तिक याच्याोबत असं नक्की काय झालं हे आपण जाणून घेऊयात.
दिनेश कार्तिक राजस्थान विरुद्धच्या सामन्यात झिरोवर आऊट झाला. दिनेशला एडम झॅम्पा याने एलबीडब्ल्यू आऊट केलं. यासह दिनेश कार्तिक याच्या नावावर वाईट रेकॉर्ड झाला आहे. दिनेश कार्तिक याने रोहित शर्मा याच्या विक्रमाची बरोबरी केली.
दिनेश कार्तिक याने रोहित शर्मा याच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यासह आता दिनेश हा रोहितसह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारा फलंदाज ठरला आहे. दिनेशची झिरोवर आऊट होण्याचीही 16 वी वेळ ठरली.
सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे बॅट्समन
दिनेश कार्तिक – 16
रोहित शर्मा – 16
मनदीप सिंह – 15
सुनील नारायण – 15
अंबाती रायुडू – 14
आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा
दरम्यान आरसीबीला राजस्थानवर 112 धावांच्या फरकाने विजय मिळवल्याने मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये थेट सातव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीचा नेट रन रेट हा आता +0.166 असा आहे. आरसीबीचा या सामन्याआधी नेट रन रेट हा -0. 345 असा होता. तर राजस्थानला पराभवाचा मोठा फटका बसला. राजस्थानची पाचव्यावरुन सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.