IPL 2023 : Hardik pandya च्या गुजरात टायटन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी

IPL 2023 : काही खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत, ज्याचा फटका आयपीएलमधील टीम्सना बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स टीमलाही फटका बसू शकतो.

IPL 2023 :  Hardik pandya च्या गुजरात टायटन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी
Hardik-Pandya Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:47 AM

IPL 2023 : आयपीएल 2023 चा सीजन सुरु व्हायला महिन्याभराचा कालावधी उरला आहे. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरु आहेत. या दरम्यान काही खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत, ज्याचा फटका आयपीएलमधील टीम्सना बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स टीमलाही फटका बसू शकतो. जोश लिटिल या त्यांच्या गोलंदाजाला दुखापत झाली आहे. जोश लिटिल मूळचा आयर्लंडचा वेगवान गोलंदाज आहे. या दुखापतीमुळे जोश लिटिल पाकिस्तान सुपर लीगमधून बाहेर पडला आहे. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, ते अजून स्पष्ट नाहीय. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकू शकतो.

त्याला किती कोटींना विकत घेतलं?

जोश लिटिल हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. उपचारासाठी तो आयर्लंडला रवाना झाला आहे. डिसेंबर महिन्यासाठी आयपीएलच मिनी ऑक्शन पार पडलं. त्यावेळी गुजरात टायटन्स टीमने त्याला 4.4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. टीम इंडियाच्या टी 20 टीमचा कॅप्टन हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच नेतृत्व करतो. मागच्यावर्षी गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी हा संघ पदार्पणातच जेतेपद पटकावेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने कमाल केली.

PSL मध्ये कुठल्या टीमकडून खेळणार होता?

डेब्यु करतानाच गुजरात टायटन्सने आयपीएलच जेतेपद पटकावलं. जोश लिटिल 23 वर्षांचा आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो मुल्तान सुल्तान टीमकडून खेळणार होता. SA 20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅप्सकडून खेळताना त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. सावधगिरी म्हणून जोश लिटिल उपचारासाठी लगेच मायदेशी परतला, असं क्रिकेट आयर्लंडकडून सांगण्यात आलय. पुढच्या महिन्यात आयर्लंडची टीम बांग्लादेश विरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. या सीरीजमध्ये खेळण्याच लिटिलच लक्ष्य आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तो त्याचा फिटनेस मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आयपीएलचा पहिला सामना कधी ?

18 मार्चपासून आयर्लंड आणि बांग्लादेशमध्ये वनडे सीरीज सुरु होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये टी 20 सीरीज 31 मार्चपर्यंत चालणार आहे. याच दिवशी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये अहमदाबाद येथे पहिला सामना होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.