IPL मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी हा कसोटी स्पेशलिस्ट खेळाडू करतोय पदार्पण
यंदाच्या सीझनमध्ये इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो माजी कर्णधार असून कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. वयाच्या 32 व्या वर्षी पदार्पण करणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या पर्वाला सुरूवात होत असून हा थरार पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. लीगमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये लिलावात युवा खेळाडू सॅम करनला विक्रमी बोली लागलीय. जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडिअन प्रीमिअर लीगने अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. युवा खेळाडूंसाठी आयपीएल एक उत्तम प्लॅटफॉर्म असून देशाकडून खेळण्याची संधी मिळते. अशातच यंदाच्या सीझनमध्ये इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो माजी कर्णधार असून कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. वयाच्या 32 व्या वर्षी पदार्पण करणार आहे.
वयाच्या 32 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. राजस्थानच्या संघाच्या नेतृत्त्वाची धुरा संजू सॅमसन सांभाळत आहे. राजस्थानने आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतलेला खेळाडू हा दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंड संघाचा माजी कर्णधार ज्या रूट आहे. रूट हा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये भाग घेणार असून त्याला लिलावामध्ये 1 कोटी रूपयांची बोली राजस्थान संघाने लावली होती.
मी शक्य तितके नैसर्गिक खेळ करण्याचा आणि गोलंदाजांसमोर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेन. मला खात्री आहे की मी त्याचा आनंद घेईन आणि माझे सर्वोत्तम प्रदर्शन राहिल, असं ज्या रूट म्हणाला. इतकंच नाहीतर त्याने संजी सॅमसनचं कौतुकही केलं. मला संजू सॅमसनची फलंदाजी पाहणे नेहमीच आवडलं आहे. तो खूप प्रतिभावान खेळाडू आणि कर्णधार म्हणून तो आणखी परिपक्व होत असल्याचंही रूटने म्हटलं आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ:
संजू सॅमसन (c&wk), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर (wk), ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा (विकेटकीपर), कुणाल राठौर, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पीए, जो रूट