IPL 2023 CSK Winner : आयपीएल जेतेपदानंतर रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल, स्पष्टच सांगितलं की…
आयपीएल 2023 जेतेपदावर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने नाव कोरलं. या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूवर रवींद्र जडेजाने कमाल केली. या विजयानंतर धोनीने त्याला उचलून धरलं. आता जडेजाची पोस्ट चर्चेत आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचा आव्हान देण्यात आलं होतं. चेन्नईने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या म्हणजेच 15 व्या षटकात 13 धावांची गरज होती. मोहितने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यातच जमा होता. मात्र रविंद्र जडेजाच्या मनात दुसरंच काही होतं. या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूवर 10 धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने हार्दिक पांड्याला उचलून धरलं. त्यानंतर आता रवींद्र जडेजाने केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
रवींद्र जडेजाने ट्वीट करत लिहिलं आहे की, “आम्ही हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं आहे महेंद्र सिंह धोनी, माही भाई तुझ्यासाठी काय पण…” या पोस्टसोबत रवींद्र जडेजाने धोनी आणि कपसोबत आपला फोटो शेअर केला आहे.
We did it for ONE and ONLY “MS DHONI.? mahi bhai aapke liye toh kuch bhi…❤️❤️ pic.twitter.com/iZnQUcZIYQ
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 30, 2023
शेवटच्या ओव्हरचा थरार
चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूत 13 धावा पाहिजे होत्या. चेन्नईकडून शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हा जोडी मैदानात होती. तर गुजरातकडून मोहित शर्मा ओव्हर टाकत होता. पहिला चेंडू शिवम दुबेने डॉट घालवला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव घेत जडेजाला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा एक धाव घेत दुबेला स्ट्राईक दिली. तीन चेंडूत 11 धावा अशी स्थिती असताना पुन्हा चौथ्या चेंडूवर एक धाव घेत जडेजाला स्ट्राईक दिली.
आता दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर जडेजाने खणखणीत सिक्स खेचला. त्यामुळे आता विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. जडेजाने या सहाव्या बॉलवर चौकार ठोकला. चेन्नई अशाप्रकारे पाचव्यांदा चॅम्पियन झाली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.