RCB vs RR 2023 : पराभवानंतर कॅप्टन Sanju Samson ने दाखवला समजूतदारपणा, फक्त एवढच म्हणाला… VIDEO

RCB vs RR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. वरवर राजस्थान टीममधील एका प्लेयर चांगला खेळला असं दिसतय. पण त्याच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

RCB vs RR 2023 : पराभवानंतर कॅप्टन Sanju Samson ने दाखवला समजूतदारपणा, फक्त एवढच म्हणाला... VIDEO
IPL 2023 Sanju samson
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 9:28 AM

RCB vs RR 2023 : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर काल अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला, टीम मधील सदस्यांना व्यक्तीगत नाही, तर टीम म्हणून खेळा याची आठवण करुन द्यावी लागली. RCB कडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. RCB च्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने बऱ्यापैकी मजल मारली होती. पण काही विकेट्स आणि काही ओव्हर्स टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे सामना RCB च्या बाजूने फिरला.

ओपनर यशस्वी जैस्वाल हाफ सेंच्युरीच्या जवळ पोहोचल्यानंतर संथ गतीने खेळला, असं एक्सपर्ट्सच मत आहे. पण संजू सॅमसनने त्याच्यावर खापर फोडलं नाही. एक समजदार कॅप्टनच्या भूमिकेतून त्याने संपूर्ण टीमला काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

‘हा नियम आपल्याला पाळावा लागेल’

धावांचा पाठलाग करताना राजस्थानला आधी लखनौ त्यानंतर RCB कडून निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. “विनम्रता ही आपल्या टीमची आणि फ्रेंचायजीची पद्धत आहे. आपण खूप वर चाललोय किंवा खाली आहोत, त्यावेळी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवा कोणावर दोषारोप करायचा नाही, हा नियम आपल्याला पाळावा लागेल. या टीममध्ये कुणी आपल्या स्थानासाठी खेळत नाही, हा मला विश्वास आहे. प्रत्येकवेळी आपण मैदानावर उतरतो, तेव्हा टीमसाठी खेळतो. त्यामुळे स्वत:साठी नाही, टीमसाठी खेळा, याची मी तुम्हाला आठवण करुन देईन” असं संजू सॅमसन म्हणाला.

ते तिघे फिनिशिंग टच देण्यात पडले कमी

आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 11 व्या त्या 15 व्या ओव्हर दरम्यान संथ गतीने खेळ केला. एक चौकारही मारला नाही. आरसीबीच्या बॉलर्सनी टाइट बॉलिंग केली. त्यामध्ये पडीक्कल आणि जैस्वाल हे सेट फलंदाज बाद झाले. शिमरॉन हेटमायर, संजू सॅमसन आणि अश्विन हे मॅचला फिनिशिंग टच देऊ शकले नाहीत. RCB ने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान टीमने 6 बाद 182 धावा केल्या. फक्त 7 रन्सनी राजस्थानचा पराभव झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.