IPL 2024 Auction | प्रीति झिंटाच्या मोठ्या चुकीमुळे नको असलेला खेळाडू पंजाबच्या टीममध्ये
IPL 2024 Auction | IPL ऑक्शन दरम्यान असे काही क्षण आले की, ज्याने लोकांच लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. प्रीति झिंटा या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या एका चुकीची किंमत पंजाबला चुकवावी लागणार आहे. नाईलाज म्हणून एका खेळाडूला विकत घ्याव लागलं.
IPL 2024 Auction | दुबईमध्ये IPL 2024 च्या सीजनसाठी मिनी ऑक्शन पूर्ण झालय. या ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली. त्यामुळे अनेकजण हैराण झाले. त्याचवेळी काही ओळख नसलेल्या खेळाडूंचही नशीब पालटल. हे सगळं सुरु असताना, ऑक्शनमध्ये असं काही दिसलं की. ज्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. पंजाब किंग्सची मालकीण आणि बॉलिवूड स्टार प्रिती झिंटा सोबत असच काहीस झालं. प्रितीला अचानक एका टीमच्या अधिकाऱ्याने डोळा मारला. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्याने हे कृत्य केलं.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर 19 डिसेंबरला ऑक्शन पूर्ण झालं. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर बोली लागली. एकूण 72 खेळाडूंना विकत घेण्यात आलं. पंजाब किंग्सने 8 खेळाडूंवर पैसे खर्च केले. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा पंजाब फ्रेंचायजीच्या ऑक्शन टेबलवर को-ओनर नेस वाडिया आणि प्रिती झिंटा उपस्थित होते. प्रिती झिंटा नेहमीप्रमाणे Active होती.
कोणी मारला डोळा
नेहमीच ऑक्शनच्यावेळी वेगवेगळ्या फ्रेंचाजयींचे अधिकारी आपसात काही चर्चा करतात. चेन्नई सुपर किंग्सचा एका मोठा अधिकारी आणि प्रिती झिंटामध्ये असच काही झालं. पंजाब किंग्सच्या मागे चेन्नईचा टेबल होता. या टेबलावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत टीमचे कंसल्टेंट सुंदर रमनही होते. अचानक प्रिती झिंटा मागे वळली आणि चेन्नईकडे पाहून काहीतरी बोलली. त्यावेळी सुंदर रमनने तिला डोळा मारला.
कोण आहे हा अधिकारी?
आता सुंदर रमनने असं का केलं? हे फक्त प्रिती झिंटालाच माहित. सुंदर रमन आणि प्रिती झिंटा बऱ्याच वर्षांपासून परस्परांना ओळखतात. रंमन IPL च्या पहिल्या सीजनपासून 2015 च्या सीजनपर्यंत लीगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. टुर्नामेंटच आयोजन आणि फ्रेंचायजीचे मालक-अधिकारी यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
He also got some rizz with that wink!! pic.twitter.com/ELGzl6A4JC
— Shravan S (@ShravanBussin) December 19, 2023
एका चुकीची किंमत
प्रिती झिंटा आणि पंजाब आणखी एका कारणामुळे चर्चेत होते. एक्सिलिरेटड ऑक्शन दरम्यान पंजाब काही अनकॅप्ड खेळाडूंना बेस प्राइसला विकत घेतलं. यावेळी प्रीतिने शशांक सिंहसाठी चुकून पॅडल उचललं. त्यामुळे हा खेळाडू पंजाबकडे गेला. हे लक्षात येताच पंजाब किंग्सने ऑक्शनियर मल्लिका सागरला सांगितलं की, या खेळाडूला त्यांना विकत घ्यायच नाहीय. नियमानुसार, खेळाडूची विक्री झाल्यानंतर त्याला पुन्हा घेता येत नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून त्यांना शशांक सिंहला विकत घ्याव लागलं.