BCCI ने IPL 2024 दरम्यान या खेळाडूवर घातली बंदी, या चुकीसाठी मिळाली शिक्षा

IPL 2024: BCCI ने IPL आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजाला शिक्षा केली आहे. बीसीसीआयने यापूर्वीही या खेळाडूवर कारवाई केली होती. त्यामुळे दुसऱ्यांला त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

BCCI ने IPL 2024 दरम्यान या खेळाडूवर घातली बंदी, या चुकीसाठी मिळाली शिक्षा
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 7:39 PM

IPL 2024 : BCCI ने IPL 2024 दरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजावर बंदी घातली आहे. बीसीसीआयने त्याला ही शिक्षा केली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल खेळाडूला त्याच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

बीसीसीआयची या खेळाडूवर मोठी कारवाई

कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणावर ही कारवाई करण्यात आली आहे. मॅच फीच्या 100 टक्के दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आयपीएल 2024 च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ईडन गार्डन्स येथे होत असलेल्या सामन्यात देखील त्याला खेळता येणार नाहीये. कारण आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्यावर एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे. त्याने त्याचा गुन्हा कबूल देखील केला आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

हर्षित राणाकडून दुसऱ्यांदा चूक

बीसीसीआयने यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा हर्षित राणावर कारवाई केली आहे. त्याने याआधीही एकदा चूक केलीये. याआधी हर्षित राणाला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या एकूण 60 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. हंगामाच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर हर्षित राणाने फ्लाइंग किस केले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती.

हर्षित राणाची आयपीएल 2024 मधील कामगिरी

हर्षित राणा याने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 9.79 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. अशा स्थितीत आगामी सामन्यात केकेआरला त्याची उणीव भासू शकते.

टीम इंडियाची घोषणा

टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातच टीम इंडिया खेळणार असून उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू

रिंकू सिंग, शुभमन गिल, खलील अहमद आणि आवेश खान

मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.