IPL 2024 : मुंबई इंडियन्स कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याची जोरदार तयारी, व्हिडीओ पोस्ट करत दाखवला रंग
वारंवार दुखापतग्रस्त होत असलेल्या हार्दिक पांड्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं आहे. कधी संघात, तर कधी संघाबाहेर अशी त्याची स्थिती असते. वर्ल्डकपपासून पुन्हा एकदा संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता आहे. असं असताना हार्दिक पांड्याने व्हिडीओ पोस्ट करत सज्ज असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा दोन महिन्यांनी होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व फ्रेंचायसी सज्ज असून मिनी लिलावात आवश्यक त्या खेळाडूंची खरेदीही झाली आहे. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला घेतलं आहे. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. असं असताना हार्दिक पांड्या आयपीएल स्पर्धेपूर्वी फिट अँड फाईन होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण हार्दिक पांड्याला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत साखळी फेरीत बांगलादेश विरुद्ध दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून तो अजूनही सावरलेला नाही. कारण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकांना मुकला होता. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. अशा सर्व बातम्या समोर येत असताना आयपीएल 2024 स्पर्धेत खेळणार का? असाही प्रश्न आहे. पण आता हार्दिक पांड्याने एक व्हिडीओ पोस्ट आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.
हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच लाखो चाहत्यांच्या कमेंट्ससाठी उड्या पडल्या आहेत. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या जीममध्ये चांगलाच घाम गाळताना दिसत आहे. वेगवेगळ्या एक्टिव्हिटी करता आहे अशी पोस्टही त्याने लिहिली आहे. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेसाठी हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असेल असं सांगण्यात येत आहे. मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळणार आहे.
View this post on Instagram
पांड्या 2015 ते 2021 या कालावधीत मुंबई इंडियन्ससाठी खेळला. यात त्याने 92 सामने खेळला आणि 153 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 27.33 सरासरीने 1476 धावा केल्या. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 42 गडीही बाद केले. मुंबई इंडियन्सने पाच जेतेपद जिंकली त्यात हार्दिकही होता. तर 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने जेतेपद जिंकलं होतं.
मुंबई इंडियन्सचा संघ : रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, हार्दिक पांड्या (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.