IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये मोठा बदल, नगिदी ऐवजी 29 चेंडूत शतक करणारा खेळाडू
Jake Fraser-McGurk in IPL 2024: जेक फ्रेझर याने देशातंर्गत क्रिकेटमध्ये २०२३ मध्ये २९ चेंडूत शतक केले होते. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष या नव्या खेळाडूकडे गेले. त्याच्या या शतकीय खेळीमुळे क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांचा विक्रम मागे पडला.
मुंबई | 17 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामासोबत आयपीएलची मेजवाणी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. २२ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमने एक मोठा बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने नव्या दमाचा खेळाडू घेतला आहे. लुंगी नगिदी याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जेक फ्रेजर-मॅकगर्क याचा टीममध्ये समावेश केला आहे. लुंगी दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे.
असा आला जेक फ्रेजर संघात
दुखापतीमुळे लुंगी स्पर्धेतून बाहेर आहे. यामुळे आता जेक फ्रेजरचा समावेश केला आहे. त्याने २९ चेंडूत शतक करण्याचा पराक्रम केला होती. लुंगी आयपीएलच्या दुसऱ्या आवृत्तीत पार्ल रॉयल्सकडून शेवटचा खेळला होता. यावर्षी 2 फेब्रुवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध खेळल्यापासून तो मैदानाबाहेर आहे. दरम्यान, डीसीने ५० लाख रुपयांच्या राखीव किंमतीवर जेक फ्रेजर याला घेतले आहे.
50 लाखांच्या राखीव किमतीवर खरेदी
टाटा इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ने अष्टपैलू जेक फ्रेझर-मॅकगुर्क याला लुंगी नगिदी याच्या जागी नियुक्त केले आहे. तो आतापर्यंत 14 आयपीएल सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 25 बळी आहेत. परंतु दुखापतीमुळे IPL 2024 मधून बाहेर पडला. यामुळे 50 लाखांच्या राखीव किमतीवर दिल्लीने घेतल्याची माहिती संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
जेक फ्रेझर मॅकगर्क हा ऑस्ट्रेलियचा धडाकेबाज खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बिग बॅश लीगमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरी केली होती. रिकी पाँटिंग याने या २१ वर्षीय खेळाडूचे कौतूक केले आहे. हा क्रिकेटपटू त्याला तरुण डेव्हिड वॉर्नर याची आठवण करून देतो, असे पाँटिंग म्हणाले होते.
जेक फ्रेझर याने देशातंर्गत क्रिकेटमध्ये २०२३ मध्ये २९ चेंडूत शतक केले होते. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष या नव्या खेळाडूकडे गेले. त्याच्या या शतकीय खेळीमुळे क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांचा विक्रम मागे पडला.