आयपीएलच्या 17 सामन्यांत भारताला मिळाले दोन फ्यूचर स्टार, एकाची गोलंदाजीत धूम, दुसऱ्याचा फलंदाजीत धमका

ipl 2024: अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा अंगकृश रघुवंशी याने केल्या होत्या. आयपीएल 2024 मधील ऑक्शनमध्ये KKR ने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले. त्याने कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यातून पदार्पण केले.

आयपीएलच्या 17 सामन्यांत भारताला मिळाले दोन फ्यूचर स्टार, एकाची गोलंदाजीत धूम, दुसऱ्याचा फलंदाजीत धमका
mayank yadav and angkrish raghuvanshi
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 8:11 AM

आयपीएलचा धमका सुरु झाला आहे. आयपीएल सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सामन्यांमध्ये चौकार अन् षटकारांचा पाऊस पडत आहे. फलंदाज आणि गोलंदाजांचा सामना रंगत आहे. या दोन आठवड्यात प्रतिभावंत खेळाडू समोर येत आहेत. आयपीएलमधील 17 सामन्यातून दोन नावांची चर्चा सुरु झाली आहे. या 17 सामन्यांत भारताला मयंक यादव आणि अंगकृश रघुवंशी हे दोन स्टार मिळाले आहेत. या दोघांमधील प्रतिभा आयपीएलमधून दिसून आली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटचे हे दोन फ्यूचर स्टार म्हटले जात आहेत.

मयंक यादवची चर्चा

आयपीएलमध्ये रियान परागपासून अभिषेक शर्मापर्यंत अनेक चांगले भारतीय खेळाडू मिळाले आहेत. परंतु सर्वाधिक चर्चा मयंक यादव आणि अंगकृश रघुवंशी यांची होऊ लागली आहे. मयंक यादव लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले होते. परंतु 2024 मध्ये त्याला संधी मिळाली.

आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध तो पहिला सामना खेळला. त्यात 4 षटकांत 27 धावा देऊन 3 मोठ्या फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. या सामन्यात त्याने 155.8 किमी प्रतीतास या वेगाने गोलंदाजी करुन सर्वांना चकीत केले. त्यानंतर RCB विरुद्ध त्याने 156.7 किमी प्रतीतास या वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीसमोर जॉनी बेयरस्टो, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरन ग्रीन यासारखे खेळाडू थक्क झाले आहेत. आता मयंक आयपीएल 2024 मधील 2 सामन्यांत 6 बळी घेऊन पर्पल कॅपच्या स्पर्धेत आहे.

हे सुद्धा वाचा

अंगकृश रघुवंशी याची जोरदार कामगिरी

अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा अंगकृश रघुवंशी याने केल्या होत्या. आयपीएल 2024 मधील ऑक्शनमध्ये KKR ने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले. त्याने कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यातून पदार्पण केले. त्याने या सामन्यांत 27 चेंडूत 54 धावांची जोरदार बॅटींग केली. त्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात त्याने सुनील नरेनसोबत 104 धावांची भागिदारी केली.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.